मध्य प्रदेशमधील आयएएस अधिकारी शैलबाला मार्टीन यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. शैलबाला मार्टीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मंदिरांवर लावण्यात येणाऱ्या लाउडस्पीकरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर एक नवीन वाद पेटला आहे. हिंदू संघटनांनी या वक्तव्याचा विरोध खेला असून काँग्रेस पक्षाकडून त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.