IAS अधिकाऱ्यावर ईडीची मोठी कारवाई, पूजा सिंघल यांना अटक

Pooja Singhal
Pooja Singhalesakal
Updated on
Summary

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी IAS अधिकाऱ्यावर ईडीनं मोठी कारवाई केलीय.

झारखंडमध्ये (Jharkhand) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money laundering Case) IAS अधिकारी पूजा सिंघल (Pooja Singhal) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय. अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीनं (ED) त्यांना अटक केलीय. अलीकडेच ईडीनं पूजा सिंघल यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या रांची आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यादरम्यान ईडीला 19 कोटींहून अधिक रोख आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत.

Pooja Singhal
आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

दरम्यान, पूजा सिंघल यांच्या निवासस्थानाशिवाय त्यांच्या पतीच्या रांचीतील (Ranchi) रुग्णालयातही ईडीनं छापा टाकला होता. तपास यंत्रणेनं पैसे तर जप्त केलेच, शिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रेही मिळवली. याशिवाय अनेक फ्लॅटमध्ये दोघांनी केलेल्या गुंतवणुकीची बाबही समोर आली असून सुमारे दीडशे कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रे मिळाल्याचं सांगण्यात आलंय. त्या सर्व पुराव्यांच्या आधारे पूजा सिंघल, त्यांचा पती सीए सुमन कुमार यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. पूजा यांच्यापूर्वी त्यांचे सीए सुमन कुमार यांच्यावरही ईडीनं कारवाई केलीय. उद्या त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.