UPSCची ऐशी तैशी! दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचा आरोप, IAS अधिकाऱ्याचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

IAS Praful Desai: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे कारनामे उघड झाले होते. हे प्रकरण सध्या देशभरात गाजत असताना युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी अनेकांनी विविध गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत.
IAS Praful Desai Viral Photos And Video
IAS Praful Desai Viral Photos And VideoEsakal
Updated on

तेलंगणातील आयएएस अधिकारी प्रफुल्ल देसाई यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षेत आरक्षण मिळविण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युपीएससी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान नुकतेच पुण्यातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे कारनामे उघड झाले होते. हे प्रकरण सध्या देशभरात गाजत असताना युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी अनेकांनी विविध गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत.

प्रफुल्ल देसाई सध्या करीमनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पूजा खेडकर प्रकरणानंतर सोशल मीडियावर प्रफुल देसाई यांचे घोडेस्वारीसह साहसी खेळ खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरील आरोपांनी जोर धरला आहे.

देसाई यांच्यावर UPSC परीक्षेसाठी OH (ऑर्थोपेडिकली दिव्यांग) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिले आहे.

IAS Praful Desai Viral Photos And Video
Yogi Adityanath: योगी अदित्यनाथांचे मुख्यमंत्रीपद जाणार? दिल्लीत काय काय घडले? मंत्री आमदारच म्हणत आहेत...

"विद्यार्थ्यांना उत्तर द्या सर..."

प्रफुल देवाई यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एका युजरने त्यांना आवाहन करत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण मागिलतले आहे.

या युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "तुम्ही प्रफुल्ल देसाई, 2019 च्या बॅचमधील AIR 532 रँकसह EWS आणि ऑर्थोपेडिकली दिव्यांग श्रेणीतील IAS अधिकारी आहात. Twitter वर लोक तुमचे सायकलिंग, टेनिस खेळताना, राफ्टिंग आणि घोडेस्वारीचे फोटो शेअर करत आहेत. आता हे फोटो सार्वजनिक असताना, तुम्ही अचानक तुमचे एक्स अकाउंट प्रायव्हेट केले आहे. तुम्हाला कशाची भीती आहे?"

या युजरने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कृपया UPSC ची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी इच्छुकांच्या शंकांचे निरसन करा. अनेक मेहनती विद्यार्थी समर्पण आणि कठोर परिश्रमातून आपली स्वप्ने जिवंत ठेवतात. कृपया त्यांना उत्तर द्या सर!"

IAS Praful Desai Viral Photos And Video
Yogi Adityanath: भावी पंतप्रधान म्हणवले जाणारे योगी अदित्यनाथ मुख्यमंत्रीपद गमावणार? केजरीवालांचा 'तो' दावा ठरू शकतो खरा

देसाईंचे स्पष्टीकरण

या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण देताना प्रफुल देसाई म्हणाले, "मी नियमित बॅडमिंटनपटू नाही पण काही वेळा मी माझ्या बॅचमेट्ससोबत तिथे गेलो आहे. माझ्या अपंगत्वाचा अर्थ असा नाही की मी अजिबात चालू शकत नाही. मी मित्रांसोबत थोडं खेळायचा प्रयत्न करतो."

डिसेंबर 2020 मध्ये डोंगरात 25 किमी सायकलिंग आणि ट्रेकिंग करतानाच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रावर देसाई म्हणाले, " अपंगत्वामुळे मी माझ्या एका पायाने पेडल करू शकतो आणि दुसऱ्या पायाचा आधार घेऊ शकतो. आम्ही मसुरी ते केम्प्टी फॉल्स असा प्रवास केला. त्या दिवशी मी संपूर्ण ट्रेकमध्ये नाही तर थोडा वेळ सायकल चालवली."

"मी माझ्या मित्रांसोबत फिरलो. डोंगरात ट्रेकिंग हा आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होता आणि त्यानंतरच्या ट्रेकिंगच्या मार्गावर, आम्ही खाली उतरत असताना उतारामुळे सायकल चालवण्याची गरज नव्हती. माझ्या राफ्टिंगचा जो फोटो शेअर केला जात आहे तोही आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.