4 वेळा UPSC क्लिअर केली, तरीही नोकरी देण्यात आली नाही, इस्रोत वैज्ञानिक असलेल्या कार्तिक यांची व्यथा

Kartik Kansal denied service cleared UPSC four times: चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील मस्कुलर डिस्ट्रॉफी (muscular dystrophy) असलेल्या एका उमेदवाराला प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी देण्यात आली नसल्याचं समोर आलं आहे.
Kartik Kansal
Kartik Kansal
Updated on

नवी दिल्ली- प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. खेडकरने विकलांग कोट्याचा चुकीचा फायदा घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रतिष्ठित अशा यूपीएससीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात, चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील मस्कुलर डिस्ट्रॉफी (muscular dystrophy) असलेल्या एका उमेदवाराला प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी देण्यात आली नसल्याचं समोर आलं आहे.

कार्तिक कंसल यांनी आयआयटी रुरकी येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते सध्या इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. कार्तिक हे वयाच्या १४ व्या वर्षांपासून व्हिलचेअर वापरत आहेत. ते २०१९ ( रँक ८१३), २०२१ ( कँक २७१), २०२२ (रँक ७८४), २०२२ (रँक ८२९) असे चारवेळा यूपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. तरी देखील ते आज प्रशासकीय सेवेत नाहीत.

Kartik Kansal
Pooja Khedkar : पूजा खेडकर बेपत्ता? दोनवेळा समन्स पाठवूनही चौकशीसाठी आलीच नाही

२०२१ मध्ये त्यांनी २७१ वा रँक मिळवला असल्याने विकलांगता कोट्याचा फायदा न घेताही त्यांना आयएएस पोस्ट मिळायला हवी होती. २७२ आणि २७३ रँक असलेल्यांना आयएएसची पोस्ट मिळाली. पण, मस्कुलर डिस्ट्रॉफीचा आयएएसच्या पात्रता निकषांमध्ये सामावेश नसल्याने त्यांना आयएएसची पोस्ट नाकारण्यात आली.

मस्कुलर डिस्ट्रॉफी (Muscular dystrophy) या आजाराचा समावेश इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस ग्रुप A मध्ये आहे. कार्तिक यांचा तो दुसरा प्राधान्यक्रम होता. तरी देखील त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यात आलेले नाही. AIIMS च्या मेडिकल बोर्डाने सांगितलं की, त्यांच्या मांसपेशी कमकूवत आहेत. त्यांच्या हात आणि पाय यांना मस्कुलर डिस्ट्रॉफीची बाधा झालेली आहे.

Kartik Kansal
Pooja Khedkar: पूजा खेडकरचा पर्दाफाश करणारा वैभव कोकाट नेमका कोण? त्याने प्रकरण कसे उघडकीस आणले?

विशेष म्हणजे हात आणि पायावर परिणाम झालेल्यांना प्रशासकीय सेवेतमध्ये सामावून घेतलं जातं, पण मस्कुलर डिस्ट्रॉफीबाबत तसं करण्यात आलेलं नाही. मेडिकल बोर्डाने त्यांना प्रशासकीय सेवेतील पदांसाठी असक्षम ठरवलं आहे. कार्तिक यांचे मूळ अपंगत्व प्रमाणपत्र त्यांना ६० टक्के अपंग ठरवतं, तर AIIMS च्या मेडिकल बोर्डाने त्यांना ९० टक्के अपंग ठरवलं आहे.

निवृत्त आयएएस अधिकारी संजीव गुप्ता यांनी कार्तिक यांना पाठिंबा देणारे ट्विट केल आहे. यूपीएससीने कार्तिक यांच्यासोबत न्याय केला नाही असं ते म्हणाले आहेत. कार्तिक यांनी कोणाच्याही मदतीशिवाय यूपीएससीची परीक्षा दिली आहे. फक्त त्यांना टॉयलेटला जाण्यासाठी मदत घ्यावी लागली. याशिवाय ते आयएएस आणि आयआरएस पदासाठी लागणारे सर्व निकष पूर्ण करतात. कार्तिक हे सध्या सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल (CAT) मध्ये आपली केस लढत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.