डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर हा सोहळा संपन्न झाला आहे.
आयएएस टीना दाबी (Tina Dabi) आणि आयएएस प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) नुकतेच विवाहबंधनात अडकलेत. जयपूरमधील (Jaipur) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघं एकमेकांचे झाले. लग्नाचा एक फोटोही आता समोर आलाय. ज्यामध्ये टीना आणि प्रदीप पांढऱ्या रंगाच्या पोशाखात एकमेकांसमोर उभे असलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या फोटोसमोर हा सोहळा होत आहे. हा सोहळा बौध्द पध्दतीनं झाल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलाय.
फोटोमध्ये प्रदीप आणि टीना यांच्या गळ्यात हार दिसत आहे आणि लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करून लोक या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी काही लोकांचं लक्षही आंबेडकरांच्या फोटोकडं गेलं. एका व्यक्तीनं लिहिलंय, 'बाबासाहेबांचा फोटो पाहून खूप आनंद झाला.'
टीना दाबीला यूपीएससीच्या पहिल्या दलित टॉपरचा टॅगही मिळालाय. 2015 मध्ये UPSC मध्ये टॉप झाल्यापासून ती जातीवरून चर्चेत आहे. टीनानं एका मुलाखतीत असंही सांगितलं होतं की, प्रदीप तिच्यासारखाच एससी समुदायातून येतो. एका प्रसंगी टीना म्हणाली होती, आज मी जी काही आहे ती आंबेडकरांमुळेच आहे. बाबासाहेबांच्या संघर्षातून मला सतत प्रेरणा मिळालीय. आता टिनाच्या आयुष्यात बाबासाहेब किती महत्त्वाचे आहेत, हे दाखवण्यासाठी लग्नाच्या निमित्तानं आंबेडकरांचा फोटो पुरेसा आहे.
प्रदीप आणि टीना यांचा 20 एप्रिल रोजी विवाह झाला होता. आज जयपूरमधील हॉटेल हॉलिडे इनमध्ये त्यांचं भव्य रिसेप्शन होणार आहे. निमंत्रण पत्रिकेनुसार हा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होणार आहे. टीना दाबीचं हे दुसरं लग्न आहे. 2018 च्या सुरुवातीला तिनं 2015 चा दुसरा UPSC टॉपर अतहर आमिर खानशी लग्न केलं. मात्र, 2 वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. आता टीनानं तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या प्रदीपशी लग्न केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.