IAS टीना डाबी झाल्या आई, गोंडस मुलाला दिला जन्म

IAS टीना डाबी यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे
IAS Tina Dabi Become Mom
IAS Tina Dabi Become Momesakal
Updated on

IAS Tina Dabi Gave Birth To Baby Boy : IAS टीना डाबी यांच्याबाबतती महत्वाची बातमी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. २०१५ बॅचच्या आयएस टॉपर ऑल इंडिया रँक १ असलेल्या आयएस ऑफिसर टीना डाबी यांनी गोंडस मुलाला जन्म दिलाय. या बातमीने टीना यांचे पती आयएस प्रदीप गावंडेसह संपूर्ण कुटुंब आनंदात असून टीना यांच्या चाहत्यांसाठीसुद्धा ही आनंदाची बातमी ठरली आहे. २२ एप्रिल २०२२ रोजी टीना आणि प्रदीप गावंडे लग्नबंधनात अडकले होते.

घरात गोंडस बाळाचे आगमन

टीना डाबी यांना त्या आई होणार आहे ही बातमी कळेपर्यंत त्या जैसलमेरच्या कलेक्टर होत्या. जेव्हा त्यांना त्या आई होणार असल्याची बातमी कळाली तेव्हा त्यांनी नॉन फील्ड पोस्टिंगसाठी अर्ज केला होता. ज्याला स्वीकृतीही मिळाली. ज्यानंतर आधी मेडिकल लिव्ह आणि नंतर मॅटर्निटी लिव्ह्जवर पाठवण्यात आले. अखेर आज टीना आणि प्रदीप गावंडे या जोडप्याने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

IAS Tina Dabi Become Mom
Tina Dabi: लग्नाच्या 1 वर्षानंतर टीना डाबी होणार आई, नवरा बायकोत १३ वर्षांचं अंतर

टीना डाबीचे प्रदीप गावंडे यांच्याशी २०२२ मध्ये झाले लग्न

यूपीएससी २०१५ टॉपर राजस्थान कॅडरच्या अधिकारी टीना डाबी यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये आयएस ऑफिसर प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केलंय. तेव्हा ते चुरूचे जिल्हाधिकारी होते.

IAS Tina Dabi Become Mom
IAS Tina Dabi : पाकिस्तानातून आलेल्या १५० हिंदूंच्या घरांवर चालवला बुलडोझर; कलेक्टर टीना डाबी निशाण्यावर

टीना डाबीला मिळाला होता पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद

टीना डाबी यांच्या लग्नानंत त्यांना मिळालेली ही मोठी भेट. जेव्हा टीना डाबी या जैसलमेर जिह्याच्या कलेक्टर होत्या त्यावेळी पाकिस्तानातील विस्थापित लोकांना जमीन मिळवून दिल्यावर एका वृद्ध महिलेने त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला होता. त्यांनी टीना डाबीला मुलगा होण्यासाठी आशीर्वाद दिला. त्याचा आशीर्वाद आज सत्यात उतरला असून या गोड बातमीने सगळ्यांनाच आनंद झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.