नवी दिल्ली : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत सध्या बऱ्याच बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावरही याबाबत तसेच या विरोधात अशा सर्व प्रकारच्या पोस्ट पडत आहेत. यापार्श्वभूमीवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं वर्तमान पत्रे, टीव्ही चॅनेल्स, डिजिटल पोर्टल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांच्यासाठी एक अॅडव्हाजरी अर्थात मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. (I&B Ministry issues advisory to check spread of unverified provocative)
काय म्हटलंय या अॅडव्हायजरीत?
देशातील सुसंवाद किंवा सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी खोटी, फेरफार केलेला किंवा जातीय तणावर निर्माण करणारा कोणताही मेसेज किंवा बातमी प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी.
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे. या काळात विशेषत: सोशल मीडियावर काही असत्यापित, प्रक्षोभक आणि बनावट माहिती पसरु शकते. ज्यामुळं सांप्रदायिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते. या संदर्भात, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन अॅक्ट, 1995 अंतर्गत कार्यक्रम संहितेच्या तरतुदींचे पालन केलं पाहिजे. तसेच प्रेस कौन्सिल अॅक्ट, 1978 अंतर्गत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं देखील माध्यमे याचं पालन करतील याकडं लक्ष द्यावं.
यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, चुकीच्या, निराधार, दिशाभूल करणारी किंवा विकृत कन्टेटला माध्यम प्रसिद्धी देणार नाहीत. देशाची एकता आणि अखंडते विरोधात प्रक्षोभक भाषा वापरली असल्यास त्याला प्रसिद्धी देता कामा नये.
वृत्तपत्रे, सोशल मीडियावर तसेच टीव्ही मीडिया, डिजिटल मीडिया टिप्पणी किंवा माहिती सादर करताना योग्य संयम आणि सावधगिरी बाळगतील. ज्यामुळं राज्य आणि समाजाचे सर्वोच्च हित धोक्यात येणार नाही.
केबल नेटवर्कसाठी - धर्मिक बाबींवर भाष्य किंवा धार्मिक गटांचा तिरस्कार करणारे शब्द किंवा सांप्रदायिक मनोवृत्तींना प्रोत्साहन देणारे शब्द प्रयोग असलेला कुठलाही कार्यक्रम प्रसारित करु नये.
वरील बाबी लक्षात घेऊन, वर्तमानपत्रे, खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेल आणि डिजिटल मीडियावरील बातम्या आणि चालू घडामोडींच्या प्रकाशकांना सूचित करण्यात येते की, खोटी किंवा फेरफार किंवा सामंजस्य बिघडवण्याची क्षमता असलेला कोणताही कन्टेंट प्रकाशित करण्यापासून दूर राहावं. देशातील सार्वजनिक सुव्यवस्था, जबाबदाऱ्यांचा भाग म्हणून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नमूद केलेल्या स्वरूपाची माहिती होस्ट, प्रदर्शित किंवा प्रकाशित न करण्याचा सल्ला दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.