WHO नंतर ICMRनं सांगितलं दुसऱ्या लाटेचं कारण

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने कुंभमेळा आणि राजकीय कार्यक्रमांमुळे भारतातील रुग्णसंख्या वाढली, असा दावा केला होता.
Corona 2nd wave
Corona 2nd waveFile photo
Updated on
Summary

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने कुंभमेळा आणि राजकीय कार्यक्रमांमुळे भारतातील रुग्णसंख्या वाढली, असा दावा केला होता.

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने (Corona 2nd wave) अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी दुसरीकडे मृतांची संख्या वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसून येते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) असा दावा केला आहे की, कोरोनाची दुसरी लाट येण्यास जो कोरोना व्हायरस म्युटंट जबाबदार आहे, तो विदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांमुळे आलेला आहे. हा म्युटंट प्रवासी मजूर आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे देशभर पसरला. (ICMR study blames religious gatherings and migrants movements transmitted virus behind second wave)

Corona 2nd wave
लसीकरणच उपाय, अन्यथा ६ महिन्यात तिसरी लाट

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीएमआरने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, प्रवासी मजूर आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोना संक्रमणाचा प्रसार देशभर झाला. पहिल्या टप्प्यात सार्स सीओवी-२ व्हेरियंटमध्ये आढळलेला अमिनो अॅसिट म्युटेशन स्ट्रेन पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सार्स सीओवी-२ च्या विश्लेषणावरून स्पाइक प्रोटीनमध्ये ई४८४क्यू म्युटेशनची उपस्थिती होती. मार्च ते जुलै २०२० मध्ये हा म्युटंट महाराष्ट्रात आढळून आला. स्पाइक प्रोटीनमधील एन४४०के अमिनो अॅसिड हा आणखी एक म्युटंट तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाममध्ये मे २०२० मध्ये आढळून आला होता. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने कुंभमेळा आणि राजकीय कार्यक्रमांमुळे भारतातील रुग्णसंख्या वाढली, असा दावा केला होता.

Corona 2nd wave
घरीच करा कोरोना चाचणी, ICMR ची पुण्यातील टेस्ट किटला मंजुरी

दरम्यान, रॅपिड अँटीजेन टेस्टचा घरगुती वापर लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यावर केला जाऊ शकतो. पण, मॅन्युअलमध्ये वर्णन केलेल्या पद्धतीनुसारच त्याचा वापर करावा, असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.