कोरोना व्हेरिएंटमुळे (Corona) सर्वत्र काळजीचे वातावरण आहे, या दरम्यान भारतीय शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने एक टेस्ट किट तयार असून ज्यामुळे अगदी काही तासांत कोरोनाव्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) शोधण्यात येणार आहे, या किटमुळे ऑमिक्रोनचे वाढता प्रसार रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
सध्या देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या दरम्यान शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांच्या नेतृत्वाखाली रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर (RMRC) च्या शास्त्रज्ञांच्या टिमने टेस्ट किट विकसित केली आहे, जी नमुन्यातून दोन तासांत ओमिक्रॉन व्हेरियंट शोधते. सध्या ओमिक्रॉन शोधण्यासाठी, कोविड पॉझिटीव्ह व्यक्तीच्या स्वॅब नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागते, ज्यासाठी बरेच दिवस लागतात. मात्र ICMR च्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन परिषदेने (RCMR) रिअल टाइममध्ये ओमिक्रॉन डिटेक्शन किट बनवण्यात यश मिळवले आहे.
सध्या Omicron व्हेरिएंट शोधण्यासाठी किमान 36 तास लागतात. त्याच वेळी, संपूर्ण जीनोम अनुक्रम पूर्ण करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. अशा परिस्थितीत या किटचे आगमन अगदी सोपे होणार आहे.
ICMR-RMRC, दिब्रुगडने Omicron व्हेरिएंट (B.1.1.529) SARS-CoV-2 (COVID-19) शोधण्यासाठी हायड्रोलिसिस प्रोब-आधारित रिअल-टाइम RT-PCR टेस्ट डिझाइन आणि विकसित केली आहे. ही टेस्ट घेतल्यानंतर अवघ्या 2 तासांच्या आत नवीन व्हेरिएंट ओळखता येणार आहेत अशी माहिती डॉ बोरकाकोटी यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, या किटबाबत माहिती देताना सांगितले की, ही एक मोठी गोष्ट आहे. ते म्हणाले की सध्या Omicron प्रकार शोधण्यासाठी किमान 36 तास लागतात. त्याच वेळी, संपूर्ण जीनोम अनुक्रम पूर्ण करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. त्यामुळे या किटमुळे हे काम अगदी सोपे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.