वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर कारावाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येथून पुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सामान्य दंडाच्या रक्कमेपेक्षा दुप्पट दंड भरावा लागणार आहे. याबाबत वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय कृष्ण शर्मा (Ajay Krishna Sharma) यांनी आदेश दिले आहेत. हे आदेश दिल्ली पोलिसांसाठी देण्यात आले आहे. (Delhi Traffic Police)
काही पोलीस सरकारी वाहने चालवताना तसेच चालकाच्या शेजारी बसल्यानंतर सीट बेल्ट (Seat Belt) लावत नसल्याचे आढळून आले असल्याचे शर्मा यांनी 2 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत संवेदनशील बनवून त्यांना सुधारित मोटार वाहन कायद्याची जाणीव करून देण्याची गरज असून पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतुकीचे नियम मोडल्यास दुप्पट दंडाची (Fine) तरतूद आहे. त्यामुळे तुमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्याची गरज आहे, असे शर्मा यांनी म्हटले असून, दंड टाळण्यासाठी आणि विभागाची प्रतिमा मलिन होणे रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांना केले आहे.
वाहतूक विभागाच्या निरीक्षकांना सर्व अभियोजक अधिकाऱ्यांना मोटार वाहन कायदा आणि इतर कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणार्यांवर त्यांची श्रेणी आणि वर्ग विचारात न घेता नेहमीच्या पद्धतीने कारवाई करण्यास सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणवेशात किंवा सरकारी वाहन चालवताना कोणताही पोलीस कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्याच्यावर कायद्यातील योग्य तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल आणि एमव्ही कायद्याच्या कलम 210B अंतर्गत केलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात स्पष्ट सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.