ती आमची चूकच; अमित शहांची कुबुली

If Markazs Program Had Been Stopped On Time This Time Would Not Have Come says Amit Shah
If Markazs Program Had Been Stopped On Time This Time Would Not Have Come says Amit Shah
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती. त्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणे ही आमची चूकच होती अशी कबुली केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अमित शहा म्हणाले, मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकार प्रत्येक कोरोना योद्ध्यासोबत आहे. देशभरात कोरोना योद्धांवर हल्ला होण्याच्या ७० ते ८० घटना समोर आल्या आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी कठोर पावलं उचलण्यात आली. भारतात आजवर जितकी संकट आणि महामारी आली आहे. त्याच्याशी सर्व सरकारांनी लढा दिला आहे. प्रत्येक वेळी सरकारांनी परिवर्तनं आणली होती. मात्र, यावेळी संपूर्ण देशच याच्याशी लढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लॉकडाउनवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे कोरोना विषाणूच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.