Ukraine Russia War: नाटोने युद्धात उडी घेतली तर रशियाची धडगत नाही

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध कधीही तिसर्‍या महायुद्धाचे रूप धारण करू शकतं.
Ukraine Russia War
Ukraine Russia Warsakal
Updated on

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध कधीही तिसर्‍या महायुद्धाचे रूप धारण करू शकतं. नाटोचे माजी सरचिटणीस अँडर्स रासमुसेन

यांच्या एका विधानावरून असे संकेत मिळतात. अँडर्स यांनी विल्नियस येथे झालेल्या युतीच्या शिखर परिषदेत हे विधान केलं असून नाटोच्या ए ग्रुप मधील अमेरिकेसह इतर सदस्य देशांनी युक्रेनच्या सुरक्षेची हमी न दिल्यास नाटो आपलं सैन्य युद्धात पाठवण्यास तयार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

रासमुसेन यांचं विधान अशा वेळी आलंय जेव्हा ते भविष्यातील युरोपियन सुरक्षा साच्यात युक्रेनचे स्थान ठरवण्यासाठी युरोप आणि वॉशिंग्टनला भेटी देत आहेत. त्यांचे हे विधान पाश्चिमात्य देशांचा मूड जाणून घेण्यासाठी आणि रशियासाठी इशारा देण्यासारखं आहे. नाटो युद्धात उतरल्यास त्याचे परिणाम भयंकर होतील, असं पुतीन यांनीही अनेकवेळा उघडपणे बोलून दाखवलं आहे.

मग युद्धाचा कल बदलेल, महायुद्ध सुरू होईल

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. रशिया युक्रेनवर हिंसक हल्ला करतो आणि युक्रेनही त्याला प्रत्युत्तर देत आहे. जर नाटो देशांनी युद्धात उडी घेतली तर लढाई नाटो आणि रशिया यांच्यात होईल. असं जर झालं तर आज रशियासमोर युक्रेनची जी अवस्था आहे तीच अवस्था नाटोसमोर रशियाची होईल.

या स्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेकदा इशारा दिलाय की रशिया एकतर अणुहल्ल्याचा विचार करेल किंवा मित्र देशांकडून मदत मागेल. दोन्ही प्रकरणांमध्ये तिसर्‍या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल.

Ukraine Russia War
Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळ बनलं धोकादायक, या राज्यांत बरसणार कहर

नाटोसमोर रशियाची ताकद काहीच नाही

नाटो ही 27 देशांची लष्करी आघाडी आहे. या अर्थी त्यांची ताकद खूप जास्त आहे. रशिया समोर कुठेही थांबत नाही. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर नाटो देशांकडे सुमारे 54 लाख 5 हजार 700 सैनिक आहेत, तर रशियाकडे केवळ 13 लाख 50 हजार सैनिक आहेत. युक्रेन युद्धादरम्यान हे आणखी कमी झाले आहेत.

जर आपण सक्रिय सैनिकांबद्दल बोललो तर नाटोकडे 33 लाख 66 हजार सैनिक आहेत, तर रशियामध्ये सक्रिय सैनिक फक्त 8 लाख पन्नास हजार आहेत. निमलष्करी दलाच्या तुकड्यांमध्येही असेच आहे. नाटोकडे 7 लाख 38 हजार 700 निमलष्करी जवान आहेत, तर रशियाकडे केवळ 2.5 लाख आहेत.

शस्त्रास्त्रांच्या बाबतीतही रशियाला मागे आहे

जर आपण शस्त्रास्त्रांबद्दल बोललो, तर रशिया येथेही नाटो देशांपेक्षा खूप मागे आहे. आकडेवारीचा विचार करता नाटोकडे 20 हजार 723 विमाने आहेत, तर रशियाकडे 4173 विमाने आहेत. त्याचप्रमाणे नाटोकडे 1048 ग्राउंड अॅटॅक विमाने आहेत आणि रशियाकडे फक्त 739 आहेत.

टँकर विमानांच्या बाबतीतही नाटो रशियाच्या कितीतरी पटीने पुढे आहे. रशियाकडे त्यापैकी फक्त 20 आहेत, तर नाटो देशांकडे 678 टँकर विमाने आहेत. हेलिकॉप्टरच्या बाबतीतही असंच आहे, नाटो देशांकडे 8585 आणि रशियाकडे फक्त 1543 विमाने आहेत.

रासमुसेन यांचा दावा

नाटोचे माजी सरचिटणीस अँडर्स रासमुसेन यांनी दावा केला आहे की, जर युक्रेनच्या सुरक्षेसाठी स्पष्ट रणनीतीवर नाटो सहमत नसेल, तरच नाटोचा एक गट युक्रेनला लष्करी मदत देऊ शकेल. पोलंडचा उल्लेख करून ते म्हणाले की, विल्नियसमध्ये युक्रेनचे हात रिकामे राहिले तर युक्रेन वैयक्तिकरित्या इतर नाटो देशांची मदत घेऊ शकतो. युक्रेनला अशी मदत मिळणे पूर्णपणे कायदेशीर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.