CM K. Chandrashekhar Rao
CM K. Chandrashekhar RaoTeam eSakal

...तर जीभ कापून टाकू; CM चंद्रशेखर राव यांची भाजप नेत्यांना धमकी

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी केंद्र सरकारवर देखील आरोप केले.
Published on

इंधनाच्या किमती, केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत चीनच्या वाढत असलेल्या हालचालींवरून आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. हैदराबादमध्ये बोलत असताना चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात अत्यंत आक्रमक भूमीका घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका करू नका म्हणत भाजप कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका केल्यास त्यांची जीभ छाटून टाकू असं वक्तव्य तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्यावर हल्ला करतंय आणि केंद्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरलं आहे.

CM K. Chandrashekhar Rao
भाजप कार्यकारिणीची बैठक संपली; मोदींनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

तसेच पूढे बोलताना ते असंही म्हणाले की, तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपने 7 वर्षात काय केले? भारताचा जीडीपी बांगलादेश, पाकिस्तानपेक्षा कमी आहे आणि केंद्राने विनाकारण कर वाढवला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल देखील केंद्र सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2014 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 105 यूएस डॉलर होत्या आणि आता 83 यूएस डॉलर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या असल्याचे सांगत भाजप जनतेशी खोटं बोलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()