मोदी म्हणाले, भाजपमध्ये असत्या तर तुम्हाला निवडणूक लढवायला लावले असते

Narendra modi said, If you were in BJP, you would have been forced to contest elections
Narendra modi said, If you were in BJP, you would have been forced to contest electionsNarendra modi said, If you were in BJP, you would have been forced to contest elections
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारी (ता. ३१) सकाळी सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शिमला येथे पोहोचले. येथे त्यांनी विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी एका महिलेला सांगितले की, ती जर भाजपची कार्यकर्ता असती तर निवडणूक लढवायला लावली असती. संतोषी असे त्या महिलेचे नाव आहे. (Narendra modi said, If you were in BJP, you would have been forced to contest elections)

संतोषीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पीएम मोदी (Narendra Modi) म्हणाले, ज्या पद्धतीने तिने तिचे मत मांडते त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. जर ती भाजपची कार्यकर्ता असती तर निवडणूक लढवण्यास सांगितले असते. ‘तुम्ही कन्नडमध्ये बोलत होत्या. परंतु, तुमच्या शब्दावरून मला जाणवले किती समाधान मिळाले आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Narendra modi said, If you were in BJP, you would have been forced to contest elections
मुकुल वासनिकांच्या उमेदवारीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

संतोषी या आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र योजनेच्या लाभार्थी आहे. ‘आदरणीय पंतप्रधान महोदय, पूर्वी आमच्या घरात, गावात ही सुविधा नव्हती. त्यावेळी खूप समस्या होत्या. औषध मिळणे कठीण होते. आता आरोग्य केंद्र सुरू झाले आहे.

माझ्या आईसह गावाला लाभ मिळत आहे. औषधे मोफत दिली जात आहेत. आम्ही सर्व निरोगी आहोत’, असे कन्नड भाषेत त्या म्हणाल्या. मोदींनी (Narendra Modi) कर्नाटकातील कलबुर्गी येथील संतोषीला विचारले की, तिला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. उत्तर देताना संतोषी बोलत होत्या.

Narendra modi said, If you were in BJP, you would have been forced to contest elections
राज्यसभेच्या उमेदवारीवरून आशिष देशमुखांनी काँग्रेसलाच विचारले प्रश्न

किसान सन्मान निधीचा ११वा हप्ता जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला आणि किसान (Farmer) सन्मान निधीचा ११ वा हप्ता म्हणून २१,००० कोटी जारी केले. लडाखमधील माजी सैनिकाने पंतप्रधानांना सांगितले की, त्यांना ‘जल जीवन मिशन आणि पीएम आवास योजना (ग्रामीण)चा’ फायदा झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.