द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा ‘इफ्को’ने लावला शोध

रासायनिक खत व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा ‘इफ्को’ने शोध लावला आहे.
IFFCO
IFFCOSakal
Updated on

पुणे, नवी दिल्ली - रासायनिक खत (Chemical Fertilizer) व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा (Liquid Nano Urea) ‘इफ्को’ने (IFFCO) शोध (Research) लावला आहे. सुमारे ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेल्या यशस्वी चाचण्यानंतर याच वर्षापासून ‘नॅनो’च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात होईल. (IFFCO Discovers Liquid Nano Urea)

अर्धा लिटर नॅनो युरियाची किंमत २४० रुपये ठेवण्यात आली आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे (इफ्को) राज्य विपणन व्यवस्थापक यू. आर. तिजारे यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले, की गुजरातमध्ये इफ्को जैव नॅनो तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापण्यात आले आहे. तेथील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमानंतर जगातील पहिला द्रवरूप नॅनो युरिया तयार केला आहे. देशातील इतर भागांत व महाराष्ट्रात देखील या युरियाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. युरिया वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे होणारे फायदे अभूतपूर्व स्वरूपाचे असतील.

IFFCO
देशात लशींच्या मिक्सिंगला अद्याप परवानगी नाही; सरकारचं स्पष्टीकरण

शेतकरी सध्या दाणेदार खताचा भरमसाट वापर काही भागांत करतात. मात्र दाणेदार युरिया मोठ्या प्रमाणात वाया जातो. त्यातून पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते. दाणेदार युरियाला पर्याय म्हणून इफ्कोने नॅनो युरिया आणला. शास्त्रज्ञांनी अर्धा लिटर नॅनो युरियात ४० हजार पीपीएम इतके नायट्रोजन टाकले आहे.

यामुळे ५० किलो गोणीतील दाणेदार युरिया इतके नत्र पिकाला मिळेल. शिवाय, दाणेदार युरियापेक्षा १० टक्क्यांनी नॅनो युरिया स्वस्त आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने झाल्यास देशातील पारंपरिक युरियाचा वापर ५० टक्क्यांनी घटू शकतो.

एरवी दाणेदार युरियाची गोणी वाहून नेणे ही शेतकऱ्यांना मोठी समस्या असते. पण नॅनो युरियाची बाटली शेतकऱ्यांना सहज खिशात ठेवता येतो. त्याच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आठ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असा दावा इफ्कोने केला आहे. इफ्कोने आपल्या ५० व्या सर्वसाधारण सभेत आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर कृषी या उपक्रमांतर्गत द्रवरूप नॅनो युरिया आणला जात असल्याची घोषणा केली.

IFFCO
CBSE बारावीच्या परीक्षा रद्द; PM मोदींच्या बैठकीत निर्णय

दाणेदार युरियाच्या जादा वापरातून प्रदूषण वाढते. मातीच्या आरोग्यास हानी होते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तसेच पिकाचीदेखील हानी होते. नॅनो युरिया आता पर्यावरणपूरक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या (एनएआरएस) अंतर्गत ‘आयसीएआर’च्या २० संशोधन संस्था, विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांवर एकूण ४३ पिकांवर नॅनो युरियाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. याशिवाय ११ हजार शेतकऱ्यांच्या ९४ पिकांवरही चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या.

ऑनलाइन विक्री होणार

‘इफ्को’च्या नॅनो युरियाचा समावेश केंद्र सरकारने खत नियंत्रण आदेश १९८५ च्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे नॅनो युरियाचे व्यावसायिक उत्पादन येत्या दोन महिन्यांत सुरू होईल व ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे. इफ्कोच्या सहकारी खत विक्री संस्थांमधून तसेच www.iffcobazar.in वर ऑनलाइन नॅनो युरियाची विक्री केली जाईल. शेतकऱ्यांना ‘नॅनो’च्या उपयोगाचे प्रशिक्षण देण्यासाठी देशभर मोहीम राबविली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()