मध्य प्रदेशात प्रचार केला, बिंधास्त फिरत राहिले...; IIT-BHU प्रकरणातील तिन्ही आरोपी अखेर 60 दिवसांनंतर कसे पकडले गेले?

IIT-BHU मध्ये विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची नावे कुणाल पांडेय, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान अशी आहेत.
iit bhu student gangrape what did accused do in 60 days before arrest  marathi news
iit bhu student gangrape what did accused do in 60 days before arrest marathi news
Updated on

IIT-BHU मध्ये विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची नावे कुणाल पांडेय, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान अशी आहेत. पोलीसांना या तीघांच्या मुसक्या आवळण्यासाठी साठ दिवसांचा वेळ लागला, यावरून विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहेत. पोलीसांकडून या साठ दिवसात त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप केला जात आहे.

या घटनेनंतर ही तीनही आरोपी बिंधास्तपणे निवडणूक प्रचार करत फिरत होते, पण प्रकरण उघडकीस आल्यानंतऱ भाजपच्या जिल्हा शाखेने तिघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की घटनेच्या सात दिवसातच या आरोपींची ओळख पटली होती मात्र पोलीसांना यांना अटक करण्यासाठी तब्बल दोन महिने लागले, सध्या य़ा प्रकरणाबद्दल वाराणसी पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. तसेच या तीघांना अटक केल्याबाबत माध्यामांसमोर कुठलाही खुलासा देखील देण्यात आलेला नाहीये.

iit bhu student gangrape what did accused do in 60 days before arrest  marathi news
IIT BHUच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक, राजकीय पक्षाशी कनेक्शन

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर तीन्ही आरोपी (कुणाल, सक्षम आणि अभिषेक) विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मध्य प्रदेशात गेले होते. निवडणूक संपल्यावर ते उत्तर प्रदेशात परत आले. पण त्यांच्या वरपर्यंतच्या ओळखींमुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगई करत होते. नंतर बीएचयू कँपसमध्ये विद्यार्थीनीसोबत झालेल्या या प्रकारानंतर ६० दिवस उलटून गेल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना वाटत होतं की पोलीस या प्रकरणात कुठलीही कारवाई करणार नाहीत, त्यामुळे तिघे या काळाता विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मध्य प्रदेशात देखील गेले होते.

इकडे विद्यार्थ्यांचे बीएचयू मध्ये आंदोलन सुरूच होते, पोलीसांवर दबाव वाढत होता, यादरम्यान जेव्हा पोलीसांनी सर्व पुरावे गोळा केले आणि आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली.

iit bhu student gangrape what did accused do in 60 days before arrest  marathi news
IIT-BHU प्रकरणातील तिन्ही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी! विद्यार्थीनीवर केले होते लैंगिक अत्याचार

पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला खूप सावधपण पावले उचलल्याचे पाहायला मिळाले, सुरूवातीला पोलीसांनी त्यांची चौकशी देखील केली नाही. आरोपींना वाटत राहिलं की आता काही होणार नाही. आरोपी बिंधास्त फिरत राहिले, निवडणूक प्रचारात सहभागी झाले. मात्र मध्य प्रदेशातून परतल्यानंतर त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

नेमकं काय झालं?

सामूहिक बलात्काराची घटना १ नोव्हेंबर २०२३ रोजी बीएचयू कँपसमध्ये मध्यरात्री घडली होती. पीडित विद्यार्थीनीने आपल्या वक्तव्यात सांगितलं होतं की तीला वेगळीकडे नेत तिला धमकी देण्यात आली, सोबतच तीच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. इतकेच नाही तर आरोपींनी तिचा व्हिडीओ बनवला आणि मोबाईल नंबर देखील घेतला.

त्यानंतर पोलीसांनी विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर लंका पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीचे कलम ३५४ (ख) आणि ६६ आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. यादरम्यान विद्यार्थी आयआयटी बीएचयू कँपसमध्ये आंदोलन करत राहिले. त्यानंतर पोलीसांनी सामूहिक आत्याचार (आयपीसी ३७६ -डी) आणि इलेक्ट्रॉनिक साधनाच्या माध्यामातून लैंगिक छळ (IPC ५०९) संबंधित कलमांमध्ये वाढ केली होती. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.