Bulletproof Jacket : IIT Delhi अन् DRDOने बनवले जगातील सर्वात कमी वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट

Bulletproof Jacket
Bulletproof Jacket
Updated on

नवी दिल्ली : 15 वर्षांच्या संशोधनानंतर अखेर भारताला जगातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यात यश आले आहे. या बुलेटप्रूफ जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्नायपरचे सहा शॉटही सहन करू शकते. हे बुलेटप्रूफ जॅकेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT दिल्ली) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.

Bulletproof Jacket
गोव्यातील नाईट क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन; आयपीएस अधिकारी निलंबीत

प्रोफेसर नरेश भटनागर यांनी सांगितले की, "वर्ष 2008 मध्ये, एक मेजर आमच्याकडे आले होते ज्यांनी स्वतःवर गोळी झेलली होती. ते म्हणाले की आम्हाला हलक्या वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट हवे आहे कारण आता आम्ही जे घातले आहे त्याचे वजन 25 किलो आहे आणि ते लोखंडाचे आहे.

चर्चेच्या 15 वर्षांनंतर गुरुवारी अखेर आयआयटी दिल्ली आणि डीआरडीओला हलके बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यात यश मिळाले. दोन बुलेटप्रूफ जॅकेट पाहिल्यावर असे आढळून आले की एकामध्ये स्नायपर रायफलमधून 6 गोळ्या झाडल्या, तरीही गोडी जॅकेटमध्ये प्रवेश करू शकली नाही. 8 AK47 गोळ्या दुसऱ्या बुलेटप्रूफ जॅकेटवर झाडण्यात आल्या, त्यातही गोळ्या घुसू शकल्या नाहीत. स्नायपर बुलेटसाठी बनवलेले जॅकेट फक्त ९.५ किलो आणि एके ४७ साठी बनवलेले जॅकेट ८.२ किलोचे वजनाचे आहे.

Bulletproof Jacket
Bachchu Kadu : शरद पवार आले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, पण आता...; बच्चू कडूंचं मोठं विधान

आयआयटीमधील पर्सनल बॉडी आर्मर सेंटरचे प्रोफेसर डॉ. नरेश भटनागर यांनी बुलेटप्रूफ जॅकेट दाखवताना सांगितले की, हे बुलेटप्रूफ जॅकेट सिरॅमिक आणि पॉलिमर मटेरियलपासून तयार करण्यात आले आहे. डॉ.नरेश भाटिया यांनी सांगितले की, हे जॅकेट बनवण्यासाठी इंटरफेस सायन्सचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून बुलेट आत जाऊ नये.

हायस्पीड कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये बुलेट घुसू शकत नसल्याचे दिसून आले. या बुलेटप्रूफ जॅकेटला बीआयएसची मान्यता मिळाली आहे. लवकरच हे बुलेटप्रूफ जॅकेट सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आयआयटीने व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.