दोन रुपयांत मिळणार एक लिटर शुद्ध पाणी, IIT कानपूरने बनवले उपकरण

आपल्यापैकी अनेकजण प्रवासादरम्यान तहान भागवण्यासाठी 20 ते 50 रुपये खर्च करत असतो.
filtered water
filtered water sakal Media
Updated on

कानपूर : आपल्यापैकी अनेकजण प्रवासादरम्यान किंवा बाहेर असताना तहान भागवण्यासाठी 20 ते 50 रुपये खर्च करत असतो. परंतु, आयआयटी कानपूरने (IIT Kanpur) अशा एका उपकरणाची निर्मिती केली आहे ज्यामुळे पाण्यातील अशुद्धता समजण्याबरोबर ते पिण्यायोग्य आहे की नाही हे देखील समणार आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रतिलिटर फक्त दोन रुपये खर्च येणार आहे. हे उपकरण फक्त पाणीच नाही तर, दुग्धजन्य पदार्थ, रस यासह सर्व पेयांमध्ये वापरले जाऊ शकते. अमेरिकेतील एमआयटीच्या शास्त्रज्ञांसोबत आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. (IIT Kanpur Develop Machine For Water Purification)

filtered water
महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रवासादरम्यान मास्क पुन्हा बंधनकारक

'अ वेसेल अँड अ मेथड फॉर प्युरिफायिंग वॉटर अँड मॉनिटरिंग क्वालिटी ऑफ वॉटर' असे या उपकरणाचे नाव असून, यासाठी IIT आणि MIT USA यांना संयुक्तपणे पेटंट मंजूर करण्यात आले आहे. लवकरच बाजारात हे उपकरण उपलब्ध होणार आहे. यामुळे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची जगासमोरील प्रमुख समस्येवर काहीअंशी मार्ग काढण्यास मदत होणार आहे. पैकी एक आहे. (Drinking Water )

filtered water
पुणे : पोटच्या मुलाला दोन वर्षे ठेवले 22 श्वानांसोबत कोंडून

विजेशिवाय वापरता येणार

संस्थेचे संचालक प्रा. अभय करंदीकर म्हणाले की, हे उपकरण विजेशिवाय (Electricity) वापरले जाऊ शकते. तसेच यासाठी देखभाल खर्चदेखील शून्य रुपये आहे. त्यामुळे लोकांना कमी दरात पाणी मिळेल. विविध समस्यांबाबत शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत असतात. शुध्दीकरण वेसल्समध्ये एक पुनरुत्पादक द्रव असतो जो अशुद्धता शोषून घेण्यास आणि ओलसर किंवा कोरड्या स्वरूपात संरक्षित करण्यास सक्षम असतो.

filtered water
VIDEO : आंध्रात समुद्राच्या लाटांमध्ये वाहत आला 'सोन्याचा रथ'

असे कार्य करणार डिव्हाइस

या उपकरणात एक भांडे आहे. ज्यामध्ये पाणी साठवले जाऊ शकते. पात्रात अशी व्यवस्था आहे, ज्याद्वारे पाणी आत-बाहेर जाऊ शकते. त्यानंतर पाण्याला एक सॉरबेंटच्या संपर्कात आणले जाते. त्यात हे सॉरबेंट रासायनिक विश्लेषक शोषून घेण्याचे कार्य करते. विशेष म्हणजे हे उपकरण पाणी शुद्ध करण्यासोबतच पाण्यात किती जंतू आणि पाणी किती अशुद्ध आहे हेदेखील अधोरेखित करण्याचे काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.