IIT मद्रासच्या एका असिस्टंट प्रोफेसरने आपल्यासोबत जातीभेद करण्यात आल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यामागचे प्रमुख कारण त्यांनी जातीवरुन भेदभाव करण्यात आल्याचं सांगितलंय.
चेन्नई- IIT मद्रासच्या एका असिस्टंट प्रोफेसरने आपल्यासोबत जातीभेद करण्यात आल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यामागचे प्रमुख कारण त्यांनी जातीवरुन भेदभाव करण्यात आल्याचं सांगितलंय. इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर विपीन पी वितील यांनी आपल्या कथित ई-मेलमध्ये म्हटलंय की, 'संस्था सोडण्यामागील एक कारण जातीभेद हा आहे. मानविकी आणि सामाजिक विज्ञान (एचएमएम) विभागात मला हा भेदभाव सहन करावा लागला. मार्च 2019 मध्ये मी या संस्थेत आलो होतो.' (IIT Madras Assistant Professor resigns over alleged caste discrimination)
प्रोफेसरने केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे? असा प्रश्न आयआयटीला विचारण्यात आला. पण, संस्थेने यावर कसलेही भाष्य करण्यास टाळलं आहे. संस्थेने म्हटलं की, 'या ई-मेलवर आम्ही कसलीही टिप्पणी करु शकत नाही. संस्थेला कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांकडून तक्रार मिळाल्यास ती सोडवण्यासाठी असलेल्या प्रक्रियेनुसार त्यावर कार्यवाही केली जाते.' प्रोफेसरचा मेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ई-मेलला आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलकडून रिट्विट करण्यात आले आहे.
विपीन पी वितील यांनी आपल्या ईमेल मध्ये म्हटलंय की, 'संस्थेमध्ये आल्यापासून मला भेदभावाचा सामना करावा लागला आहे. संस्थेतील एससी आणि ओबीसी लोकांशी बोलल्यानंतर भेदभावाची मला खात्री पटली आहे.' वितील यांनी लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संस्थेसमोर आणि गरज पडल्यास कोर्टासमोर तक्रार करण्यास सांगितलं आहे. वितीन यांनी संस्थेमध्ये एससी आणि ओबीसींचे अनुभव जाणून घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या लोकांचा समावेश असावा, असं ते म्हणाले.
आयआयटी मद्रासने हे आरोप स्वीकारले किंवा नाकारले नाहीत. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार संस्थेच्या प्रकियेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असं आयआयटी मद्रासने म्हटलंय. पोस्ट व्हायरल झाल्यापासून विपीन वितीन यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, व्हायरल मेलमुळे खळबळ उडाली आहे. देशातील एका मोठ्या संस्थेबाबत झालेल्या आरोपांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.