IIT Mumbai: 'आयआयटी मुंबई'चा वादग्रस्त निर्णय; 'ओन्ली व्हेज'ला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला लावला 10,000 रुपयांचा दंड

controversial decision: या प्रकारामुळं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारतला येत नाही.
iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested Esakal
Updated on

IIT Bombay Veg Only Policy: आयआयटी बॉम्बेनं पुन्हा एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. यामुळं व्हेज ओन्ली धोरणाचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. कारण ज्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या या धोरणाविरोधात निषेध आंदोलन केलं, त्या विद्यार्थ्याला १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (IIT Bombay student fined Rs 10000 for protesting against veg only policy)

iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
Supriya Sule: सुप्रिया सुळे विदर्भातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक; म्हणाल्या...

आयआयटीनं काय घेतला निर्णय?

आयआयटी बॉम्बेच्या मेस कॉऊन्सिलनं १२, १३ आणि १४ व्या होस्टेलमधील सामाईक जेवणाच्या ठिकाणची प्रत्येकी सहा टेबलं शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. काही विद्यार्थ्यांनी संस्थेच्या या धोरणाला विरोध करताना निषेध आंदोलन सुरु केलं होतं. यानंतर हा वाद उफाळून आला होता, त्याची नंतर देशभरात उलटसुलट चर्चाही झाली. (Latest Marathi News)

iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
हासन अली अन् विराटची खुन्नस! पण बायको 'फॅनगर्ल'

वातावरण बिघडवण्याचा आरोप

यानंतर संस्थेच्या एका समितीनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असताना असं आढळून आलं की, काही विद्यार्थी जबरदस्तीनं या संस्थेतील वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. त्यानंतर एका विद्यार्थ्यावर १०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर इतर दोन विद्यार्थ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. (Marathi Tajya Batmya)

iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
NewsClick: अभिसार शर्मा, उर्मिलेश यांच्यासह 9 पत्रकारांवर UAPA दाखल; सेटलवाड यांच्या घरी मुंबई पोलीस

SMA अकाऊंटमधून पैसे कापणार

सोमवारी होस्टेल मॅनेजरनं संबंधित विद्यार्थ्याला ईमेलद्वारे कळवलं की, त्याला १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम त्याच्या स्पेशन मेन्शन अकाऊंटमधून (SMA) वजा केले जातील. यासंदर्भात मेस काऊन्सिलनं विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि आंदोलन करणाऱ्या चर्चा करण्यासाठी बैठकही घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()