IIT Student Success Story : शाब्बास रे पठ्ठ्या! सिलेंडर वाहून 350 रूपये कमाई करणाऱ्या तरूणाने पास केली IIT परीक्षा

भली मोठी फी भरून क्लासेस लावून ही परीक्षा सर्वजण परीक्षा पास करतात. पण रोजंदारी करत, सापडलेल्या मोबाईलवर अभ्यास करून ही परीक्षा पास करणे सोपं नाही
IIT Student Success Story
IIT Student Success Story esakal
Updated on

IIT Student Success Story :

ज्याला काही करून दाखवायचं असतं त्याला कोणीच अडवू शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत व्यक्ती यशस्वी होतोच. अशी काही मोजकीच उदाहरण आपल्या समाजात आहेत. त्यापैकी एक आहे गगन. ज्याने गगनापर्यंत झेप घेतली आणि त्याचे यशाने आसमंत उजळून टाकला असा उत्तर प्रदेश मधील गगन आहे.

गगनने आयआयटीची परीक्षा पास केली आहे. भली मोठी फी भरून क्लासेस लावून ही परीक्षा सर्वजण परीक्षा पास करतात. पण रोजंदारी करत, सापडलेल्या मोबाईल वरती अभ्यास करून ही परीक्षा पास करणे सोपं नाही. हेच काम गगनने करून दाखवले आहे. (IIT Student success story )

IIT Student Success Story
मध्य प्रदेशात प्रचार केला, बिंधास्त फिरत राहिले...; IIT-BHU प्रकरणातील तिन्ही आरोपी अखेर 60 दिवसांनंतर कसे पकडले गेले?

उत्तर प्रदेश मधील अलीकडे ती राहणाऱ्या गगन याची ही कहाणी. गगन उत्तर प्रदेशातील अतरौली नगाइच पाडा येथे राहतो. त्याचं जीवन हालाखीच्या परिस्थितीतच झाले आहे. त्याचे वडील राकेश एका गॅस एजन्सीच्या गोदामात हेल्परचे काम करतात. गगनला दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे.   

वडील ज्या गोदामात काम करतात.गगनही तिथेच काम करायचा. ११ वी पासून तो सिलेंडर गाडीत भरण्याचे अन् उतरवण्याचे काम करायचा. गगनने मोठा इंजिनियर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. गगनने मागील वर्षीही परीक्षा दिली होती.

IIT Student Success Story
Mumbai Flood App: पुरावर मात करण्यासाठी मुंबईकर सज्ज! IIT ने बनवलं ॲप, तीन दिवस आधीच कळणार हवामान अंदाज

गगनने रोजंदारीवर काम करत जेईई ऍडव्हान्समध्ये यश मिळवले आहे. गगनने बनारसमधील हिंदू विश्वविद्यालयमध्ये इलेक्ट्रिकल बीटेकच्या इलेक्ट्रिकल एंड कम्युनिकेशन इंजीनियरिंग ब्रांचमध्ये ऍडमिशन घेतले आहे.  

गगनला पहिल्या प्रयत्नात 8030 वी रँक मिळाली. म्हणजे त्याला 130 गूण मिळाले होते. आर्थिक घडी सांभाळत त्याने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. यंदाच्या परीक्षेत त्याला 170 मार्क्स व ऑल इंडिया 5286 रँक मिळाली. तसेच त्याला कॅटगरी रॅंक 1027 इतकी मिळाली. त्याने आजवर घेतलेल्या मेहनतीचे हे फळ होते.

गगनचा दिवसाचा पगार होता 350 रूपये

गगन 11 वीमध्ये शिकत होता तेव्हा तो घरखर्चाला मदत म्हणून रोजंदारीवर काम करायचा. तेव्हा दिवसाला 250 सिलेंडर उचलायचा. त्याला त्याचे दररोज 350 रुपये मिळायचे. याकाळात त्याने अनेकवेळा ओव्हरटाइम सुद्धा केला आहे.

सापडलेला मोबाईल वापरला 

काम करत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोबाईलवर रिल्स पाहण्यात वेळ घालवला नाही. त्याने मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास केला. विशेष गोष्ट म्हणजे, गगनकडे असलेला मोबाईल त्याच्या वडिलांना रस्त्यावर सापडला होता. हा मोबाईल दुरूस्त करून त्याने अभ्यासासाठी वापरला.

IIT Student Success Story
Sakal Podcast : ‘IIT मद्रास’ देशातील सर्वोत्तम उच्चशिक्षण संस्था ते ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अखेर अभिषेक बोलला

गगनला 10 वीत होते इतके मार्क

गगन अतरौली येथील सिटी कान्वेंट स्कूलमध्ये शिकत होता. दहावीच्या बोर्डात 98.4 टक्के मार्कांनी पास झाला होता. 10 नंतरच त्याने त्याची भविष्याची दिशा ठरवली होती. त्यामुळे, त्याने फिजिक्ससाठी कोचिंग ऑनलाईन कोचिंग क्लास जॉईल केला. त्याला 12 वी मध्येही 95.8 टक्के मार्क पटकावले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गगन म्हणाला की, यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्हाला किती संघर्ष करावा लागतोय हे पाहणे त्यावेळी महत्त्वाचे नाही. संघर्षापासून दूर पळू नका, घाबरलात तर काहीच मिळणार नाही. अन् संघर्ष करून पार झालात तर सर्वकाही तुमच्या हातात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.