'ड्रीम इलेव्हन' बंद होणार? केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगबाबत जारी केल्या मार्गदर्शक सूचना

rajeev chandrasekhar
rajeev chandrasekhar
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगमधील बेकायदेशीर सट्टेबाजीवर बंदी घालण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केलाी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित जाहिराती न दाखवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आयटी आणि दळणवळण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली.

rajeev chandrasekhar
Narendra Modi : 2022 मध्ये अदानींच्या संपत्तीत 46 टक्क्यांनी वाढ; काँग्रेस नेत्याचा दावा

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आजपासून सट्टेबाजी बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन खेळात बेटिंग करणे आता बेकायदेशीर मानले जाईल. ते म्हणाले की, जे ऑनलाइन गेम जुगार किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देत आहेत, किंवा त्यावरून वापरकर्त्यांचे नुकसान होणार असेल आणि ज्यामुळे व्यसनाधीनता वाढत असेल, यापैकी एकही घटक आढळून आला तर ते ऍप भारतात उपलब्ध होणार नाही.

rajeev chandrasekhar
Sanjay Raut : "माझ्या आयुष्यात बाळासाहेबांइतकंच शरद पवारांनाही स्थान आहे"

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नियमात अशी तरतूद करण्यात आली आहे की गेममध्ये ऑनलाइन सट्टेबाजी किंवा सट्टेबाजीची कोणताही घटक उपलब्ध असेल, तर तो गेम इंडियामध्ये उपलब्ध नसेल. त्याला परवानगी दिली जाणार नाही. याबाबत आम्ही संबंधितांशी चर्चा करूनच आयटी नियमांमध्ये सुधारणा केल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं.

एकंदरीतच, ड्रीम इलेव्हन, माय सर्कल ११, रमी ऍप, या सारखे ऍब बंद होण्याची शक्यता आह. याबाबत अद्याप स्पष्ट काही सांगण्यात आलं नाही, मात्र सट्टेबाजी होणारे ऍप बंद होणार हे निश्चित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.