पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा प्रताप! कुलगुरुंना गलिच्छ गादीवर झोपण्यास भाग पाडलं

complaint against Punjab cm Bhagwant Mann for entering gurudwara after getting drunk
complaint against Punjab cm Bhagwant Mann for entering gurudwara after getting drunk Sakal
Updated on

नवी दिल्ली : पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (BFUHS) च्या कुलगुरूंना हॉस्पिटलच्या पाहणीदरम्यान हॉस्पिटलमधील गलिच्छ गादीवर झोपण्यास भाग पाडल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने शनिवारी पंजाबचे आरोग्य मंत्री चेतनसिंग जौरामाजरा यांची निंदा केली. (punjab health minister news in Marathi)

complaint against Punjab cm Bhagwant Mann for entering gurudwara after getting drunk
Inflation : काँग्रेस ५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घालणार घेराव

IMA ने मंत्र्यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल बिनशर्त माफी आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच आयएमएने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे आरोग्यमंत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.

एका निवेदनात, IMA ने म्हटले आहे की, "29 जुलै रोजी बीएफयूएचएसचे कुलगुरू डॉ. राज बहादूर यांचा अपमान करणाऱ्या पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्याचा आयएमए तीव्र निषेध करते. हा केवळ कुलगुरूंचाच अपमान नाही, तर संपूर्ण भारतातील वैद्यकीय व्यवस्थेचा अपमान आहे.” बहादूर यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी सेवेतून मुक्त करण्याची विनंती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कळते.

complaint against Punjab cm Bhagwant Mann for entering gurudwara after getting drunk
‘आप’चे उद्या पुण्यात युवा अधिवेशन

आयएमएने म्हटले की, "राजकीय व्यक्तींनी वैद्यकीय क्षेत्राचा अपमान आणि छळ करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे डॉक्टरांना त्रास होतो. आएमएने म्हटले की, आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या गैरवर्तनाबद्दल त्वरित बिनशर्त माफी मागावी आणि राजीनामा द्यावा. शुक्रवारी जौरामाजरा BFUHS अंतर्गत येणाऱ्या फरीदकोटमधील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करत असताना ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये, शल्यचिकित्सक बहादूर यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना गलिच्छ गादीवर झोपण्यास भाग पाडताना दिसत आहेत. तर कुलगुरू आरोग्यमंत्र्यांना सांगताना दिसतात की, गलिच्छ गाद्यांसाठी ते जबाबदार नाही. त्यावर मंत्री कुलगुरुंना म्हणाले की, सर्वकाही तुमच्याच हातात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.