बेळगाव: कर्नाटकातील (Karnataka) गाजलेल्या आयएमए (आय मॉनेटरी ॲडव्हायजरी) घोटाळा प्रकरणात (IMA Scam Case) माजी मंत्री रोशन बेग (Roshan Beg) यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची वाहने जप्त करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. राज्याच्या महसूल खात्याचे अवर सचिव मल्लिकार्जुन रामचंद्राप्पा यानी हा आदेश बजावला आहे. या आदेशानुसार एकूण चार वाहने जप्त केली जाणार आहेत. त्या चारही वाहनांची सविस्तर माहिती महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी एक वाहन दानिश पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या फर्मच्या नावे आहे. पण त्या वाहनाचा वापर रोशन बेग यांच्याकडून केला जातो असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.
रोशन बेग यांच्या नावे असलेले एक वाहन तसेच त्यांचा मुलगा रूमान बेग याच्या नावे असलेल्या दोन वाहनांची जप्ती केली जाणार आहे. आयएमए घोटाळा प्रकरणात याआधीही अनेक मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. पण यावेळी राज्याच्या माजी मंत्र्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याने खळबळ माजली आहे. या वाहनांचे मूल्य निश्चित करून त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचेही महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या माजी मंत्र्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याने खळबळ माजली आहे. या वाहनांचे मूल्य निश्चित करून त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचेही महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
ठेवीदारांकडून कोट्यावधी रूपयांच्या ठेवी जमा करून त्या परत न दिल्यामुळे आयएमए घोटाळा कर्नाटकात उघडकीस आला होता. यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे (CBI) देण्यात आली होती. या प्रकरणात राज्यातील पोलिस खात्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार या घोटाळ्यात माजी मंत्री आर. रोशन बेग यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सीबीआयने आरोपपत्रात तसे नमूद केले आहे.
रोशन बेग यानी आपल्या पदाचा वापर आयएमए कंपनीच्या प्रचारासाठी केल्याचा ठपकाही आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. आता ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी या कंपनीचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, सदस्य व संबंधितांच्या मिळकती जप्त करून, त्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आर. रोशन बेग यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. बेग यांनी कर्नाटकात विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळले आहे. नगरविकासमंत्री असताना ते बेळगावला (Belguam) आले होते.
हॉटेल इफा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यावरून बेळगावसह सीमाभागात मोठा गदारोळ उठला होता. त्यामुळे बेग हे महाराष्ट्रातही चर्चेचा विषय बनले होते. पण आयएमए घोटाळा उघडकीस आल्यापासून ते राजकारणात सक्रीय नाहीत. आता वाहनांची जप्ती व लिलावाची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.