डॉक्टरांवर होणारे हल्ले, फेक न्यूज थांबवा; IMA चं PM मोदींना आणखी एक पत्र

Pm Modi
Pm ModiAFP
Updated on

नवी दिल्ली: इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलंय. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कसल्याही भीतीविना काम करण्यासाठीचं सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. IMA ने या पत्राद्वारे थोडक्या आपलं गाऱ्हाणं पंतप्रधान मोदींसमोर मांडलं आहे. कोरोना महासंकटादरम्यान आपल्या या साऱ्या तक्रारींचं निवारण व्हावं, असाही आग्रह IMA कडून करण्यात आली आहे. या पत्रात IMA ने म्हटलंय की, जवळपास 1400 हून अधिक डॉक्टरांचा या विषाणूने बळी घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला काही लोक लसीकरणाच्या संदर्भात अविश्वास आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत, हे पाहून यातना अनावर झाल्याचंही या पत्रात सांगण्यात आलंय. पुढे या पत्रात म्हटलंय की, आम्हाला विश्वास आहे की जेव्हा तुमच्यासारखा बळकट नेता या मोहिमेचं नेतृत्व करतो तेव्हाच त्याचा संपूर्ण फायदा सर्व लोकांपर्यंत पोहोचेल. (IMA seeks PM Modi intervention to stop assault on doctors spread of fake news)

Pm Modi
कोरोना उपचारासाठी केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स, अनेक औषधे केली बंद

या आहेत मागण्या :


- वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलं जावं जेणेकरुन ते कोणत्याही भीतीविना काम करु शकतील. डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या शारीरीक आणि मानसिक हल्ल्यांना थांबवलं जावं. तसेच ऍलोपॅथी आणि लसीकरणासंदर्भात चुकीची माहिती पसरण्यापासून थांवबवलं जावं, यासाठी पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा.
- कुणीही व्यक्ती जर या कोरोना महासंकटादरम्यान सुरु असलेल्या लसीकरणासंदर्भात चुकीची माहिती पसरवत असेल, तर त्याला भारतीय दंड संहितेतील साथरोग कायदा, 1897 अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार शिक्षा केली जावी. कोणत्याही व्यक्तीला आरोग्य मंत्रलायाची मंजूरी नसताना लोकांची फसवणूक करणाऱ्या चमत्कारिक उपचारांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रयत्नांना त्वरित आळा घातला जावा.

Pm Modi
मोठी बातमी! नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार

- राज्य व खासगी रुग्णालयांवरील लसींपैकी 50 टक्के न सोडता सरकारने 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणांना प्रोत्साहन द्यावे. कोरोनाच्या संक्रमणासोबतच फंगल इन्फेक्शनची प्रकरणे देखील वाढत आहेत. सरकार प्रयत्न करत आहेच, मात्र औषधे कमी पडत आहेत. या पोस्ट कोविड लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी सर्व वैद्यकीय मार्गदर्शनासहित एक वेगळा रिसर्च सेल तयार केला जावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()