महामारी कायद्यानुसार सरकार जर त्यांच्यावर कारवाई करणार नसेल, तर आयएमए हरिद्वार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करेल, असा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ माजला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. आणि पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितले आहे. (IMA Uttarakhand sends Rs 1000 crore defamation notice to Ramdev Baba)
योग्यता सिद्ध करा
नोटीसमध्ये म्हटले आहे की, रामदेव बाबा पुढील १५ दिवसांत माफी मागू शकत नसतील, तर त्यांच्यावर एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल. एवढंच नाही, तर पुढील ७२ तासात कोरोनील किटच्या भ्रामक जाहीरातीदेखील हटवाव्यात. रामदेव बाबांना अॅलोपॅथीचा ए देखील माहीत नाही. आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहोत, त्याआधी त्यांनी त्यांची योग्यता सिद्ध करावी.
गुन्हा दाखल करण्याचा इशारा
आयएमए उत्तराखंडने पुढे म्हटलं आहे की, रामदेव बाब त्यांची औषधे विकण्यासाठी वारंवार खोटं बोलत आहेत. लसीकरणाचे दुष्परिणाम होतात, याबाबतही ते जाहीरात प्रसिद्ध करत आहेत. महामारी कायद्यानुसार सरकार जर त्यांच्यावर कारवाई करणार नसेल, तर आयएमए हरिद्वार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करेल, असा इशारा दिला आहे.
रामदेव बाबांनी विचारले होते २५ प्रश्न
दरम्यान, रामदेव बाबांनी सोमवारी ट्विटरवर एक पत्र प्रसिद्ध केले होते. या पत्राद्वारे त्यांनी आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. त्याआधी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आयएमएने तीव्र शब्दांत नाराजी दर्शवली होती. अॅलोपॅथी हे बकवास विज्ञान आहे असे रामदेव बाबा म्हणाले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी खडसावलं
थायरॉइड, अस्थमा आणि कोलायटिससारख्या आजारांवर कायमस्वरुपी उपचार उपलब्ध आहेत, का असे रामदेव बाबांनी विचारले होते. अॅलोपॅथीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आयएमएने रामदेव बाबांवर तत्काळ कारवाईची मागणी केली होती. अनेक डॉक्टर संघटना आक्रमक होऊ लागल्याचे दिसताच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रामदेव बाबांना आपले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी वक्तव्य मागे घेतले होते.
देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.