नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांच्या सामायिक प्रवेश परीक्षेबाबत युजीसीनं (UGC) महत्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या विद्यापीठांनी ही प्रवेश पद्धती स्विकारली आहे, त्यांना केवळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल, असं युजीसीचे चेअरमन एम. जगदेशकुमार यांनी म्हटलं आहे. (Imp explanation of UGC Chairman M Jagdesh Kumar regarding CUET)
जगदेशकुमार म्हणाले, जेव्हा विद्यापीठं युजी प्रवेशासाठी सेन्ट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा (NTA) पर्याय निवडतील तेव्हा त्यांना केवळ नॅशन टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
यासाठी विद्यापीठांना एनटीए किंवा युजीसीला कुठलीही फी भरण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही सामंजस्य करारांवर सह्या करण्याची गरज नाही. जेव्हा प्रवेशादरम्यान विद्यार्थी त्यांचे CUET अर्थात प्रवेश परीक्षेचे गुणपत्रिका सुपूर्द करतील तेव्हा विद्यापीठाकडून एनटीएच्या डेटाशी त्यांच्या गुणांची पडताळणी केली जाईल, असंही जगदेश कुमार यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.