बुस्टर डोसबाबत ICMR-NIVच्या संचालिकांचं महत्वाचं विधान; म्हणाल्या...

लहान मुलांसाठी पुढच्या महिन्यात लस येणार
Priya Abraham, Director, ICMR-NIV
Priya Abraham, Director, ICMR-NIV
Updated on

नवी दिल्ली : भारतात सध्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरु असून यामध्ये दोन डोस घेतल्यानंतरच लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. पण आता या दोन डोसनंतरही एक बुस्टर डोस घेणं गरजेचं आहे, अशा शिफारशी यायला लागल्या आहेत. नुकतेच सीरमचे संचालक सायरस पूनावाला यांनीही पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बुस्टर डोसची गरज असून मी स्वतः बूस्टर डोस घेतल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, बुस्टर डोसबाबत आता बुस्टर डोसबाबत ICMR-NIVच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

प्रिया अब्राहम म्हणाल्या, "भविष्यात बुस्टर डोसबाबत निश्चितच शिफारशी येतील. त्यामुळे बुस्टर डोस देण्याचीही गरज भासू शकते. बुस्टर डोसबाबत सध्या अभ्यास केला जात आहे. भारताबाहेर बुस्टर डोस दिले जात आहेत. जवळपास सात विविध लस कंपन्या बुस्टरडोससाठी प्रयत्न करत आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जास्तीत जास्त देशांमध्ये लसीकरण पूर्ण होईलपर्यंत बुस्टर डोसला स्थगिती दिली आहे. कारण जास्त आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दोन लसींमधील गॅप मोठा आहे. पण भविष्यात बुस्टरडोससाठी शिफारशी नक्कीच येतील" तसेच 'मिक्स अँड मॅच' लसीला पाठिंबा देताना अब्राहम म्हणाल्या, अशा लसीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

Priya Abraham, Director, ICMR-NIV
हवामान खात्याविरोधात शेतकरी जाणार कोर्टात; जाणून घ्या कारण?

दरम्यान, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत त्या म्हणाल्या, देशात पुढच्या महिन्यापासून अर्थात सप्टेंबरपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होईल, अशी आशा आहे. सध्या २ ते १८ वयोगटातील लहान मुलांवर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत.

Priya Abraham, Director, ICMR-NIV
पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा

लवकरच लहान मुलांवरील चाचण्यांचे रिझर्ल्ट समोर येतील. त्यानंतर ते DCGI कडे याचा डेटा पाठवण्यात येईल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात किंवा त्यानंतर लगेचच आपल्याकडे लहान मुलांसाठीची लस उपलब्ध असेल. त्याचबरोबर झायडस कॅडिलाच्या लसीची देखील चाचणी सुरु असून ती मंजूर झाल्यानंतर ही देखील लहान मुलांसाठी उपलब्ध असेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा ओटीटी चॅनेल 'इंडिया सायन्स'ला मुलाखत देताना अब्राहम बोलत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.