दिल्लीत प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये महत्त्वाची बैठक

कुठल्या रणनीतीवर चर्चा?
Prashant Kishor - Sharad Pawar
Prashant Kishor - Sharad PawarGoogle file photo
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांच्यात दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. मुंबईतील (Mumbai meeting) भेटीनंतर दिल्लीत दुसऱ्यांदा दोघांमध्ये बैठक होतेय. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थान म्हणजेच, सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. कालच शरद पवार दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर पहिलीच भेट प्रशांत किशोर यांच्यासोबत होत आहे. (Important meeting between prashant kishor & sharad pawar in new delhi)

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी बैठक आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी भाजपा विरोधात तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बैठकीकडे त्याच दृष्टीकोनातून बघितले जात आहे. टाइम्स नाऊशी बोलताना प्रशांत किशोर यांनी ही नियमित बैठक असल्याचे सांगितले. त्यांनी सविस्तर माहिती द्यायचे टाळले.

Prashant Kishor - Sharad Pawar
चीनला उत्तर देण्यासाठी घातक 'राफेल'ची १०१ फाल्कन्स स्क्वॉड्रन

याआधी १२ जूनला मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर दोघांची बैठक झाली होती. त्यावेळी पवारांनी प्रशांत किशोर यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. मुंबईतील बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते.

Prashant Kishor - Sharad Pawar
नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल - राज ठाकरे

भाजपाच्या बरोबरीने काँग्रेस देशातला दुसरा मोठा पक्ष आहे. पण भक्कम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला भाजपावर दबाव निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात सुरु आहे. प्रादेशिक पक्ष नरेंद्र मोदी सरकारविरोधात एकत्र येण्यास तयार आहेत. प्रशांत किशोर एक तज्ज्ञ निवडणूक रणनितीकार समजले जातात. तामिळनाडूत द्रमुक आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या विजयात प्रशांत किशोर यांचे सुद्धा योगदान आहे. २०१५ सालच्या बिहार विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नितीश कुमार यांच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. त्यांची सुरुवात भाजपासून झाली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपाची प्रचाराची रणनिती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोदींना मिळालेल्या मोठ्या यशानंतर प्रशांत किशोर हे नाव संपूर्ण देशात चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()