जवाहरलाल नेहरूंपासून आतापर्यंत...; जुन्या संसद भवनातील PM मोदींच्या निरोपाच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Parliament Special Session
Parliament Special Session
Updated on

Parliament Special Session: संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी जुन्या इमारतीत कामकाज झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चर्चेला सुरुवात केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.  

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्या मंगळवारपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज नवीन संकुलात हलवण्यात येणार असल्याने पंतप्रधान मोदींचे लोकसभेतील जुन्या संसद भवनातील हे शेवटचे भाषण होते. यावेळी नरेंद्र मोदी भावूक देखील झाले होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • नरेंद्र मोदी म्हणाले, सदनाचा निरोप हा खूप भावनिक क्षण आहे, जर एखादे कुटुंब जुने घर सोडून नवीन घरात गेले, तर अनेक आठवणी काही क्षणांसाठी हादरून सोडतात. हे सदन सोडताना आपले मन भरून आले.

  • पंतप्रधान मोदी यांनी नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण केले. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. यामध्ये देशवासीयांचा घाम गाळला गेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हे घर इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे आसन होते. स्वातंत्र्यानंतर या वास्तूला संसद भवनाची ओळख मिळाली. जुनी संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.

  • नरेंद्र मोदी म्हणाले, जगात सर्वत्र भारताची चर्चा होत आहे. चांद्रयान-३ च्या यशाने संपूर्ण देश भारावून गेला आहे. यामध्ये भारताच्या क्षमतेचे एक नवीन रूप विज्ञानाशी जोडले गेले आहे.  तंत्रज्ञान, विज्ञान, आपल्या शास्त्रज्ञांची क्षमता आणि देशातील १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याशी जोडलेल्या भारताच्या सामर्थ्याचे एक नवीन रूप अधोरेखित केले. आज मी पुन्हा एकदा आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करू इच्छितो.

  • "आज तुम्ही एकमताने G20 च्या यशाचे कौतुक केले आहे. मी तुमचे आभार व्यक्त करतो. G20 चे यश हे देशातील 140 कोटी नागरिकांचे आहे. हे भारताचे यश आहे, व्यक्ती किंवा पक्षाचे नाही.आपण सर्वजण साजरा करूया. भारताकडे G20चे अध्यक्षपद होते. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

  • बर्‍याच लोकांची भारताविषयी शंका घेण्याची प्रवृत्ती आहे आणि हे स्वातंत्र्यानंतरही सुरूच आहे. यावेळीही (जी20 चा संदर्भ देऊन) कोणतीही घोषणा होणार नाही, असा विश्वास त्यांना होता.

  • नवीन इमारतीविषयी मोदी म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर तिला संसद भवनाची ओळख मिळाली. ही वास्तू बांधणे हा परकीय राज्यकर्त्यांचा निर्णय होता हे खरे असले तरी याच्या बांधण्यासाठी घाम, मेहनत आणि पैसा माझ्या देशवासियांचा आहे. आपण नवीन संसदेत प्रवेश करणार आहोत मात्र जुनी इमारत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील."

  • नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा संसद सदस्य झालो आणि खासदार म्हणून या इमारतीत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा स्वाभाविकपणे मी या इमारतीच्या दारात गेलो. पण ज्या क्षणी मी डोकं झुकवून पहिलं पाऊल टाकलं तो क्षण माझ्यासाठी भावनांनी भरलेला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या गरीब कुटुंबातील एक मूल कधी संसदेत येऊ शकेल याची कल्पनाही केली नव्हती. मला लोकांकडून इतकं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.

  • "या वास्तूला निरोप देणे हा एक भावनिक क्षण आहे.अनेक कडू-गोड आठवणी याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. आपण सर्वांनी संसदेत मतभेद आणि वाद पाहिले आहेत, पण त्याचबरोबर 'परिवार भव'चे साक्षीदार आहोत."

  • "संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. हा एखाद्या इमारतीवर झालेला हल्ला नव्हता. एकप्रकारे हा लोकशाहीच्या मातेवर, आपल्या जिवंत आत्म्यावर हल्ला होता. ती घटना देश कधीही विसरू शकत नाही."

Parliament Special Session
Elvish Yadav" मला तर आत्ता कळालं तू महिला .." एल्विशनं अर्जुनला डिवचलं! शाब्दिक शीतयुद्ध सुरु..नेमकं प्रकरण काय?
  • 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे स्मरण करून पुढे जाण्याची हीच वेळ आहे. संसदेची ही इमारत सोडताना मला त्या पत्रकार मित्रांची आठवण देखील येत आहे, ज्यांनी आपले आयुष्य संसदेचे वार्तांकन करण्यात घालवले. त्यांनी कुठलेही तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही इथली माहिती देशापर्यंत पोहोचवली.

  • "आरोग्यविषयक समस्या असतानाही अनेक खासदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली. कोविड-19 संकटाच्या काळात, आमच्या खासदारांनी दोन्ही सभागृहांच्या कामकाजात हजेरी लावली आणि त्यांचे कर्तव्य बजावले.

  • "या संसदेत पंडित जवाहलाल नेहरूंच्या 'मध्यरात्रीच्या घोषणेची' ची प्रतिध्वनी आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. हीच ती संसद आहे जिथे अटलजींनी 'सरकारें आयेंगी, जायेंगी, पार्टी बनेगी, बिगेडगी; मगर ये देश रहना' असे म्हटले होते.

  • या सभागृहात अनेक ऐतिहासिक निर्णय आणि अनेक दशकांपासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला. कलम 370 रद्द करणे, जीएसटीही, वन रँक वन पेन्शन असे अनेक निर्णय या सभागृहात घेण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी दहा टक्के आरक्षणाला देशात प्रथमच कोणत्याही वादविना यशस्वीपणे परवानगी देण्यात आली.

  • या संसदेनेच इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली बांगलादेश मुक्ती चळवळला पाठिंबा दिला होता.

Parliament Special Session
Special Parliament Session: मोदींनी नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांचा केला उल्लेख! म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.