भारतावर एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती लादणे अशक्य - एम.के.स्टॅलिन

जे लोक एका भाषेचा आणि एका धर्माचा पुरस्कार करत आहेत ते आमची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत
Tamil Nadu Chief Minister MK Stalin
Tamil Nadu Chief Minister MK StalinSakal
Updated on

चेन्नई : भारतावर एक भाषा, एक धर्म आणि एक संस्कृती लादणे अशक्य आहे असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, "भारतात एक भाषा, एक धर्म आणि एक संस्कृती शक्य नाही. जे लोक एका भाषेचा आणि एका धर्माचा पुरस्कार करत आहेत ते आमची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते भारताचे आणि भारतीयांचे शत्रू आहेत." असं मत स्टॅलिन यांनी व्यक्त केलं आहे.

(Tamilnadu CM MK Stalin)

दरम्यान, दक्षिणेकडील राज्यांचा आपल्या भाषेबद्दल आणि संस्कृतीबद्दल कटिबद्ध असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. दक्षिणेकडील राज्यांचा हिंदी भाषेला मोठ्या प्रमाणात असून ते आपल्या भाषा आणि संस्कृतीवर ठाम आहेत.

Tamil Nadu Chief Minister MK Stalin
राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदे तातडीने दिल्लीला रवाना

भारताच्या प्रगतीचा एकमेव मार्ग म्हणजे मजबूत आणि स्वयंपूर्ण राज्ये. असं मत व्यक्त करत संघराज्य हा देशाचा पाया असल्याचेही स्टॅलिन म्हणाले. स्टॅलिन यांनी त्यांचे केरळमधील सहकारी पिनाराई विजयन यांचेही कौतुक केले आणि सांगितले की, तामिळनाडूमधील द्रमुक आणि सीपीआय(एम) यांच्यातील युती केवळ वैचारिक होती. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणा विरोधकांना टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()