ईव्हीएम मशिन कोणत्याही इतर यंत्रणेला जोडता येत नाही. ज्या वायरने ते कनेक्ट केले जाते त्याचे कोड आहेत.
रत्नागिरी : मतदानासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (EVM) याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत; परंतु हे मशिन कोणत्याही वायरीने किंवा वायरलेस यंत्रणेने हॅक करता येत नाही, असे स्पष्ट मत मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केलं.
EVM मधील कोणताही डाटा काढता येत नाही किंवा नवीन अपलोड करता येत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास ते डिसेबल होईल. अतिशय सुरक्षित असे हे ईव्हीएम मशिन आहे, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या काही निवडणुकांचा निकाल पाहता ईव्हीएम मशिनवर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. कोणतेही बटन दाबले तरी एकाच व्यक्तीला मतदान होते. त्यामुळे ते निवडून येतात, असे आरोपदेखील विरोधकांनी केले होते. त्यामुळे ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी काँग्रेससह काही पक्षांनी केली होती. ईव्हीएम मशिनबाबत आजही अनेकांच्या मनात संशय आहे.’’
मशिन हॅक केली जाते, वस्तुस्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांना केला. यावर ते म्हणाले, ‘‘ईव्हीएम मशिन अतिशय अद्ययावत आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी नवे बदल करण्यात येऊन ते अधिक सुरक्षित होत गेले आहे. अतिशय पारदर्शक अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिन हॅक करणे, त्यामध्ये बदल करणे हे शक्य नाही. निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शक होते.’’
ईव्हीएम मशिन कोणत्याही इतर यंत्रणेला जोडता येत नाही. ज्या वायरने ते कनेक्ट केले जाते त्याचे कोड आहेत. त्यानुसारच ते जोडले जाऊ शकते, तसेच कोणी त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ते डिसेबल होते. मशिनला अन्य वायर जोडता येत नाही किंवा वायरलेस यंत्रणेनेही ते हॅक करता येत नाही. टेक्निकल कमिटी असते. त्यांच्या मान्यतेशिवाय हे मशिन चालत नाही. ती एकदा सील केली की, त्यामध्ये काही बदल करता येत नाही, असे देशपांडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.