नवी दिल्ली : द्विपक्षीय वेतन वाटाघाटी समिती (बीडब्ल्यूएनसी) व भारतीय बंदर संघ (आयपीए) यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्यामुळे भारतातील १२ मोठ्या बंदरांमध्ये नियोजित बेमुदत संप टाळण्यात यश आले. केंद्रीय बंदर, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मध्यस्थी केल्यामुळे नियोजित संप टळला.