2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी

2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी
Updated on

नवी दिल्ली : देशात 2020 मध्ये निष्काळजीपणाने वाहन चालवण्यामुळे 1.20 लाख लोकांचा जीव गेला आहे. या वर्षामध्ये लॉकडाऊनचा काळ असूनही ही परिस्थिती पहायला मिळाली आहे. सरासरी जर काढायला गेली तर 2020 साली दररोज तब्बल 328 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) 2020 सालच्या आपल्या वार्षिक 'क्राईम इंडिया' रिपोर्टमध्ये हा खुलासा केला आहे. या रिपोर्टनुसार, निष्काळजीपणामुळे झालेल्या रस्ते अपघातामध्ये तीन वर्षांच्या दरम्यान 3.92 लाख लोकांचा जीव गेला आहे. तर 2020 मध्ये 1.20 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2019 मध्ये 1.36 लाख आणि 2018 मध्ये 1.35 लाख मृत्यू झाले आहेत.

2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी
उत्तराखंडमध्ये 'आप'चे सरकार आल्यास स्थानिकांना 80 टक्के आरक्षण

हिट अँड रनची 1.35 लाख प्रकरणे

केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार देशात 2018 नंतर 'हिट अँड रन'चे 1.35 लाख प्रकरणे दाखल केली गेली आहेत. एकट्या 2020 मध्ये हिट अँड रनची 41,196 प्रकरणे समोर आली होती. तर 2019 मध्ये 47,504 आणि 2018 मध्ये 47,028 प्रकरणे होती. या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात देशभरात प्रतिदिन सरासरी हिट अँड रनची 112 प्रकरणे समोर आली आहेत.

जखमी होणाऱ्यांची संख्या 1.30 लाख

सार्वजनिक मार्गांवर वेगवान गतीने अथवा निष्काळजीपणे वाहन चालवण्यामुळे जखमी होण्याच्या प्रकरणांमध्ये 2020 मध्ये 1.30 लाख, 2019 मध्ये 1.60 लाख आणि 2018 मध्ये 1.66 लाख होते. तर गंभीर जखमी होण्याची प्रकरणे 2020 मध्ये 85,920, 2019 मध्ये 1.12 लाख आणि 2018 मध्ये 1.08 लाख होती.

2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी
सुखजिंदर रंधवांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ? अधिकृत घोषणा बाकी

रेल्वे दुर्घटनेमध्ये 521 मृत्यू

याचप्रकारे देशभरात 2020 मध्ये रेल्वे दुर्घटनेमध्ये निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये 52 प्रकरणे दाखल झाली आहेत. याआधी 2019 मध्ये 55 आणि 2018 मध्ये 35 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

उपचारांमध्ये निष्काळजीपणामुळे 133 मृत्यू

देशात 2020 दरम्यान उपचारांमध्ये निष्काळजीपणामुळे 133 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर 2019 मध्ये हा आकडा 201 आणि 2018 मध्ये 218 होता. रिपोर्टनुसार, 2020 मध्ये नागरी संस्थांच्या निष्काळजीपणामुळे 51 मृत्यू तर 2019 मध्ये 147 आणि 2018 मध्ये 40 प्रकरणांची नोंद झालीय. 2020 मध्ये इतर निष्काळजीपणामुळे 6,367 मृत्यू प्रकरणांची नोंद केली गेली आहे तर 2019 मध्ये 7,912 आणि 2018 मध्ये 8,687 प्रकरणांची नोंद झालीय.

एनसीआरबी रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की, कोरोना महासाथीमुळे देशात 25 मार्च 2020 पासून 31 मार्च 2020 पर्यंत लॉकडाऊन लागलेला होता. या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दळणवळण खूपच कमी होती. तरीही अशा अपघातांच्या दुर्घटनांमध्ये तुलनात्मक रित्या काही घट झालेली दिसून आलेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.