श्रद्धा वालेकर या वसईतल्या तरुणीच्या निर्घृण हत्येने सध्या देशभरात खळबळ माजली आहे. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिच्य़ा मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे तीन आठवडयांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवले आणि विविध जंगलांत टाकले. एवढी क्रूरता आली कुठून? त्याचा खुलासा आता झाला आहे.
आफताब अमीन पुनावाला याने आपली प्रेयसी श्रद्धा हिची अत्यंत थरारक पद्धतीने हत्या केली आहे. या हत्येपूर्वी त्याने गुन्ह्यांसंदर्भातल्या अनेक वेबसिरीज आणि चित्रपट पाहिले, ज्यामध्ये अमेरिकी सिरीज डेक्स्टर हिचाही समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आणि डेक्स्टर या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याचं समोर आलं आहे. खरंतर हा खून सहा महिन्यांपूर्वीचा आहे. आत्ता दिल्ली पोलिसांनी केवळ चारच दिवसांत त्याची पाळंमुळं खोदून काढली आणि हा प्रकार उघडकीस आणला.
आरोपी आफताब मुंबईचा रहिवासी असून श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली. श्रद्धा आणि आफताब दोघे मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करायचे. ते डेटिंग अॅपच्या माध्यमातून मुंबईत भेटले होते. ते तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर ते दिल्लीला स्थायिक झाले. तिथे जाताच श्रद्धाने आफताबमागे लग्नाचा तगादा लावला होता, त्यानंतर आफताबने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
काय आहे ही डेक्स्टर सीरिज?
डेक्स्टर ही अमेरिकी मालिका आहे. या मालिकेचा नायक डेक्स्टर याने आपल्या आईची हत्या आपल्या डोळ्यांनी पाहिलेली असते, तिसऱ्या वर्षी तो अनाथ होतो. त्यानंतर त्याला हॅरी नावाचा एक पोलीस अधिकारी दत्तक घेतो. डेक्स्टरच्या मनावर आईच्या हत्येचा परिणाम झालेला असतो. याचा फायदा घेऊन हॅरी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या आरोपींची हत्या डेक्स्टरकडून करून घेतो. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याला फॉरेन्सिक स्पेशालिस्टची नोकरी लावतो. सगळ्या खोलीत प्लास्टिक लावून तो या आरोपींची हत्या करत असतो आणि त्या मृतदेहाचे तुकडे करून समुद्रात फेकत असतो. डेक्स्टर या सिरीजचे एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. २०१३ साली या सिरीजचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. अॅमेझॉन प्राईमवर ही सिरीज पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.