गांधीनगर- गुजरातच्या अहमदाबादमध्ये फक्त सात वर्षांपूर्वी बांधलेला हाटकेश्वर पूल तोडून पुन्हा बांधण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. ४२ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला होता, आता हा पूल पुन्हा बांधला जाणार असून यासाठी ५२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सदर मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद नगर निगमने यासंदर्भात चौथ्यांदा टेंडर जारी केला आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये ज्या कंपनीने या पुलाचे बांधकाम केले होते, त्या कंपनीकडून पूल नव्याने बांधण्यात येणारा खर्च वसूल केला जाणार आहे. 'इंडिया टुडे'ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.