अहमदाबाद: वयाची साठी म्हणजे वृद्धत्वाकडे (old age) वाटचाल. खरंतर हे वय आजी-आजोबा बनण्याचं, नातवंड खेळवण्याचं. पण या वयात एखादी महिला गर्भवती राहिली तर? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, हे कसं काय शक्य झालं? असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. गुजरातच्या (Gujarat) कच्छमध्ये वयाच्या ७० व्या वर्षी एका महिलेने बाळाला जन्म (baby birth) दिला. जिवूबेन वल्लभाई राबरी असे या महिलेचे नाव आहे.
IVF मुळे वयाच्या ७० व्या वर्षी या महिलेला मातृत्वाचं सुख लाभलं. या वयात बाळाला जन्म देणं इतकं सोपं नव्हतं. भुजमधल्या डॉक्टरांसमोर एक मोठं आव्हान होतं. पण महिलेची जिद्द आणि हिम्मत यामुळे हे शक्य झालं. रापार तालुक्यात मोरा गावात राहणाऱ्या जिवूबेनकडे वयाचा कोणताही पुरावा नाहीय. पण या महिलेचे वय ६५ ते ७० च्या दरम्यान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
समुपदेशन करताना डॉक्टरांनी या वयात गर्भवती राहण्याचा धोका पत्करु नका असा सल्ला जिवूबेनला दिला होता. पण आई बनण्यासाठी त्या खूप भावनिक झाल्या होत्या. "आधी आम्ही तोंडी औषधे देऊन जिवूबेनची मासिक पाळी नियमित केली. त्यानंतर वयामुळे आकुंचन पावलेल्या गर्भाशयाची रुंदी वाढवली" असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नरेश भानुशाली यांनी सांगितलं. त्यानंतर IVF तंत्राने महिला गर्भवती राहिली.
दोन आठवड्यांनी सोनेग्राफी केली. त्यामध्ये गर्भाची वाढ होत असल्याचे दिसले. ह्दयाचे ठोके आणि बाळाची वाढ व्यवस्थित होती. आईला कुठल्याही सहव्याधी नव्हत्या. वयोमानानुसार रक्तदाब लक्षात घेऊन आठ महिन्यानंतर डॉक्टरांनी प्रसुती शस्त्रक्रिया केली. आई आणि बाळ दोघेही तंदुरुस्त आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.