Train Accident: फक्त नितीश कुमार नाही तर या दोन रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा! कोण होते ते?

Train Accident: गेल्या काही दिवसांमध्ये भीषण रेल्वे अपघात झाले आहेत. आज पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला. याआधी वर्षभरापुर्वी ओडीसामध्ये भीषण अपघात झाला होता.
In history of train disasters only 2 railway ministers have resigned
In history of train disasters only 2 railway ministers have resigned Esakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये भीषण रेल्वे अपघात झाले आहेत. आज पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला. याआधी वर्षभरापुर्वी ओडीसामध्ये भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये २३३ जणांचा मृत्यू झाला होता, तर आज झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या अपघाताने पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या सर्व अपघातांची आठवण करून दिली. इतिहासाची पाने उलटून पाहिली तर लक्षात येईल की, दोन रेल्वे मंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता.

लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता राजीनामा

साधारण 1956 सालची गोष्ट असेल. नोव्हेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये अरियालूर रेल्वे अपघात झाला होता. त्यावेळी झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारताचे तिसरे रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री (13 मे 1952 ते 7 डिसेंबर 1956) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या अपघातात 142 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सचोटीची व्यक्ती म्हणून त्यांचा आदर केला आहे.

यानंतर लाल बहादूर शास्त्री यांची लोकप्रियता वाढली होती ज्यांनी नंतर भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी इतर मंत्रिपदांचा कार्यभार स्वीकारला.

In history of train disasters only 2 railway ministers have resigned
Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

नितीश कुमारांनी दिला होता राजीनामा

त्यानंतरही रेल्वे अपघात थांबले नसले तरी रेल्वे दुर्घटनेनंतर असे धाडस दाखवण्यासाठी एका रेल्वेमंत्र्यांना तब्बल ४३ वर्षांचा कालावधी लागला. भारताचे 28 वे रेल्वे मंत्री नितीश कुमार (19 मार्च 1998 ते 5 ऑगस्ट 1999) यांनी आसाममध्ये ऑगस्ट 1999 मध्ये झालेल्या गॅसल ट्रेन दुर्घटनेसाठी नैतिक आधारावर आपलं मंत्री पद सोडलं होतं. या अपघातात 290 जणांना जीव गमवावा लागला.

In history of train disasters only 2 railway ministers have resigned
Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, 5 प्रवाशांचा घटनेत मृत्यू

ममता बॅनर्जींनीही दिला होता राजीनामा

त्यानंतर एक वर्षानंतर, 2000 मध्ये रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन रेल्वे अपघातानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी यांनी वाजपेयींनी त्यांचा राजीनामा नाकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.