Petrol Price: भारतात 'या' राज्यात पेट्रोल 170 रुपये लिटर तर गॅस सिलेंडर1,800 रुपये, काय आहे कारण?

राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दुप्पटीने महाग झाल्या आहेत.
Petrol Price
Petrol PriceSakal
Updated on

Petrol Price: या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्याबाहेरील वस्तूंच्या आयातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दुप्पटीने महाग झाल्या आहेत.

मणिपूरच्या बहुतांश भागात सिलेंडर, पेट्रोल, तांदूळ, बटाटे, कांदे आणि अंडी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री होत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक मांगलेम्बी चानम यांनी सांगितले की, “पूर्वी 50 किलोचे तांदूळ 900 रुपयांना मिळत होते.

पण आता ते 1800 रुपयांना आहे. बटाटा आणि कांद्याच्या दरातही 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्याबाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे.''

बटाटा 100 रुपये किलो:

काळ्या बाजारात गॅस सिलिंडर 1800 रुपयांना मिळतो, तर अनेक भागात पेट्रोलची किंमत 170 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे, असे चनम यांनी सांगितले.

ते म्हणाले, “अंड्यांची किंमतही वाढली आहे. 30 अंड्यांचा एक क्रेट 180 रुपयांना मिळत होता, मात्र आता 300 रुपयांना मिळत आहे.''

ते म्हणतात की, 'जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सुरक्षा दलांनी कडक निगराणी ठेवली आहे, अन्यथा किंमती आणखी वाढू शकल्या असत्या. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दल येण्यापूर्वी बटाट्याचे भाव 100 रुपये किलोवर गेले होते.

मणिपूरमधील ज्या जिल्ह्यांना हिंसाचाराचा फटका बसला नाही, तेथे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही.

तामेंगलाँग जिल्ह्यात रेशन दुकान चालवणाऱ्या रेबेका गंगमेई म्हणाल्या, “आवश्यक वस्तूंच्या, विशेषतः तांदळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

आमच्या जिल्ह्यात हिंसाचार झाला नाही. केवळ मांसाहारी पदार्थांच्या किंमतीत कोणताही बदल दिसून आला नाही, कारण ते इतर राज्यांतून आयात केले जात नाही आणि ते फक्त स्थानिक लोकांकडूनच खरेदी केले जाते."

Petrol Price
LIC Q4 Results: LIC च्या नफ्यात 5 पट वाढ, शेअरहोल्डर्सना मिळणार 'एवढा' लाभांश

मणिपूरमधील हिंसेच प्रकरण काय आहे?

मैती समाजाने अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली होती. याच्या निषेधार्थ 3 मे रोजी इंफाळ खोऱ्यात आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. यानंतर मैती आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला, ज्यात 70 हून अधिक लोक ठार झाले.

विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, ज्यामुळे राज्यातील ट्रकच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या मोर्चामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होऊ शकतो, अशी भीतीही वाहतूकदारांमध्ये होती. त्यामुळे वाहतुक बंद करण्यात आली.

त्यामुळे राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. या हिंसाचारात इंफाळ पश्चिम जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

परिस्थिती आणखी बिघडल्यामुळे राज्यात सुमारे 10,000 लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले.

मणिपूरच्या एकूण लोकसंख्येच्या 53 टक्के मैती समुदाय आहे, या समुदायाचे लोक बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. तसेच नागा आणि कुकी जमाती मिळून मणिपूरच्या लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत. हे दोन्ही समुदाय प्रामुख्याने मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

Petrol Price
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.