Election on Ballot Paper: प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी मतदान यंत्राऐवजी ‘या’ ठिकाणी बॅलेट पेपरवर झाली निवडणूक; नेमकं काय घडलं?

Election on Ballot Paper: निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांचा वापर सुरू होऊन वीसहून अधिक वर्षे झाली आहेत. एका मतदान यंत्रावर १६ आणि चार यंत्रे एकमेकांना जोडल्यास ६४ इतक्याच उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर मावू शकतात.
Election on Ballot Paper
Election on Ballot PaperEsakal
Updated on

निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांचा वापर सुरू होऊन वीसहून अधिक वर्षे झाली आहेत. एका मतदान यंत्रावर १६ आणि चार यंत्रे एकमेकांना जोडल्यास ६४ इतक्याच उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर मावू शकतात. लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघातून सर्वसाधारणपणे २० आणि क्वचित एखाद्या मतदारसंघातून चाळीसच्या आसपास उमेदवार उभे असतात.

उमेदवारांच्या संख्येनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानयंत्रे उपलब्ध करून दिली जातात. मात्र, आपल्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी रिंगणात उडी घेतल्याने मागील लोकसभा निवडणुकीत तेलंगणमधील निजामाबाद मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे लागले होते.

Election on Ballot Paper
Sandeshkhali Case : संदेशखाली अत्याचाराची ‘सीबीआय’ चौकशी करा; कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश; ममता बॅनर्जींना धक्का

तेलंगणमध्ये मागील दशकात के. चंद्रशेखर राव यांचे वर्चस्व होते. त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या के. कविता निजामाबाद निवडून आल्या होत्या. २०१९ मध्येही त्यांनाच तेलंगण राष्ट्र समितीने तिकीट दिले होते. हळदीला योग्य दर मिळवून देऊ असे आश्‍वासन तेलंगण सरकारने शेतकऱ्यांना दिले होते.

सत्तेत दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या के. चंद्रशेखर राव हे या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात चालढकल करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांनी चांगलाच दणका दिला. राज्य सरकारवरील राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी के. कविता यांना लक्ष्य करत निजामाबादमधून निवडणूक अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.

Election on Ballot Paper
'अजून वेळ गेलेली नाही, सांगलीच्या उमेदवारीचा पुनर्विचार करा'; विश्‍वजित कदमांचे 'मविआ'च्या नेत्यांना आवाहन

कविता यांचा पराभव करणे आणि आपल्या प्रश्‍नाकडे देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी अनोखी पद्धत अवलंबली. एकूण १७० शेतकऱ्यांनी निवडणूक अर्ज भरले. अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतलेच नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात एकूण १८५ उमेदवार झाले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर एवढ्या उमेदवारांची नावे मावणे शक्यच नव्हते. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब टाकत मार्गदर्शनाची विनंती केली. बरीच चर्चा होऊन अखेर या मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हेदेखील आव्हानात्मक काम होते. यासाठी आयोगाला दहा दिवसांत १५ लाख मतपत्रिका, त्याही मोठ्या आकारातील, छापून घ्याव्या लागल्या. यामुळे हा मतदारसंघ देशभर चर्चेत आला होता.

शेतकऱ्यांच्या संतापाचा फटका के. कविता यांना बसलाच. या निवडणुकीत भाजपचे अरविंद धर्मापुरी विजयी झाले.

Election on Ballot Paper
Sanjay Raut : कोणत्या फाईलमुळे यु-टर्न घेतला? संजय राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()