5G In India : 5G मुळं गावागावांत क्रांती होणार - नरेंद्र मोदी

आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा ही वेगवान पद्धतीनं सुरु होणार आहे.
5G Internet Service
5G Internet Serviceesakal

नवी दिल्ली : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा ही वेगवान पद्धतीनं सुरु होणार आहे. देशात 5G सेवा सुरु होत असून पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5 जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सरकारनं डिजिटल पेमेंटचा मार्ग सोपा केला'

एक काळ असा होता, जेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्ग गरीब लोकांच्या क्षमतेवर शंका घेत होता. गरिबांना डिजिटलचा अर्थही कळणार नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पण, देशाच्या सामान्य माणसावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. सरकारनं स्वतः पुढं जाऊन डिजिटल पेमेंटचा मार्ग सोपा केला आहे. सरकारनं स्वत: अॅपद्वारे नागरिक केंद्रित वितरण सेवेला प्रोत्साहन दिलं. मग ते शेतकरी असो किंवा छोटे दुकानदार, आम्ही त्यांना अॅपद्वारे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दिला आहे. आपल्या देशाच्या ताकदीकडं आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'डिजिटल इंडियानं सर्वांना एक व्यासपीठ दिलं'

आज आपण छोटे व्यापारी, छोटे उद्योजक आणि कारागीर बनलं पाहिजे, डिजिटल इंडियानं सर्वांना एक व्यासपीठ दिलं आहे, बाजारपेठ दिली आहे. आज तुम्ही स्थानिक बाजारात किंवा भाजी मंडईत जा आणि पहा की एखादा छोटासा रस्त्यावरचा विक्रेताही तुम्हाला सांगेल. रोख नाही, 'UPI' करा. आज देश दूरसंचार क्षेत्रात जी क्रांती पाहत आहे, तो याचा पुरावा आहे. सरकारनं योग्य हेतूनं काम केलं, तर नागरिकांचे इरादे बदलण्यासाठी कोणतीही कसर लागत नाही, असं मोदी म्हणाले.

भारतीयांना 5G च्या रूपानं ही अद्भुत भेट : मोदी

भारतात 5G ​​ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाहीय. ही सेवा म्हणजे, 130 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आहेत. 5G सह भारत सब का डिजिटल साथ आणि सब का डिजिटल विकासाच्या दिशेनं एक मजबूत पाऊल उचलेल. भारतानं थोडी उशीरा सुरुवात केली असेल. परंतु, आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं. ते 5G सेवेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

नव्या तंत्रज्ञानामुळं शिक्षणात क्रांती : नरेंद्र मोदी

मोदी म्हणाले, आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून भारतानं आज नवा इतिहास रचला आहे. 5G मुळं गावागावांत क्रांती होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळं शिक्षणात क्रांती झाली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तहसीलमध्ये 5G पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. Jio ची 5G सेवा भारतात विकसित झाली आहे, त्यामुळं त्यावर आता आत्मनिर्भर भारतचा शिक्का नोंदवला गेला आहे. भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून, आम्ही जे काही दाखवलं आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही नेतृत्व करण्यास तयार आहोत, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

5G सेवेसह भारतात एक नवीन युग सुरू होत आहे - सुनील भारती मित्तल

आज महत्त्वाचा दिवस आहे. एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. ही सुरुवात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात होत आहे. यामुळं लोकांसाठी अनेक नवीन संधी खुल्या होतील, असं भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक-अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं.

5G साठी आम्ही पुढाकार घेण्यास तयार - मुकेश अंबानी

5G साठी आम्ही पुढाकार घेण्यास तयार आहोत. 5G कनेक्टिव्हिटी हे तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीपेक्षा बरंच काही आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

आजचा दिवस दूरसंचाराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल - अश्विनी वैष्णव

आज पंतप्रधान मोदी भारतात 5G सेवा लाँच करत आहेत. आजचा दिवस दूरसंचाराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. टेलिकॉम हे डिजिटल इंडियाचा पाया आहे. डिजिटल सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे, असं दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

मोदींच्या हस्ते 5G सेवेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचं नुकतचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांसह दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी हेही उपस्थित होते.

महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार

महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाईल. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यासोबत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()