Jayant Maha-e Seva Kendra : २५० दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप करून जयंत महा-ई सेवा केंद्राचे उदघाटन

आम्ही इस्लामपूर येथे सुरू केलेल्या सेतू केंद्रातून शासकीय दरात विनासायास सेवा मिळेल.
Jayant Maha-e Seva Kendra
Jayant Maha-e Seva Kendraesakal
Updated on

इस्लामपूर : सरकारने विरोधी पक्षाला विश्वासात घेत आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्नावर निश्चित तोडगा काढायला हवा होता; मात्र सरकार विरोधी पक्षाला विश्वासात घेत नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केली.

Jayant Maha-e Seva Kendra
शाळाबाह्य,स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम

येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी संचालित जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने सिटीअस टेक हेल्थ केअर यांचे वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून २५० दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप करून जयंत महा ई सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. डॉ.शमिका नाडकर्णी (मुंबई), प्रा.शामराव पाटील, अँड. चिमण डांगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, वैभव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बी. के. पाटील, अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे प्रमुख उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले, "आरक्षणासारखा महत्वाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचा संकेत सरकार पायदळी तुडवत आहे. सरकारने विरोधी पक्षाला केवळ बैठक आणि चर्चेला बोलविताना ते काय करणार आहेत,हे सांगायला हवे. सध्या सेतू केंद्रातून सामान्य माणसांची लूट चालली असून लोकांना हेलपाटे घालायला लागणे, दुर्दैवी आहे. आम्ही इस्लामपूर येथे सुरू केलेल्या सेतू केंद्रातून शासकीय दरात विनासायास सेवा मिळेल." शहाजी पाटील यांनी स्वागत केले. प्रा. शामराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. इलियास पिरजादे यांनी आभार मानले. बाळासाहेब पाटील,देवराज पाटील,विनायक पाटील,शशिकांत पाटील, व्यंकटराव पाटील, संजय पाटील,खंडेराव जाधव,संग्राम जाधव, देवराज देशमुख,विश्वनाथ डांगे, पुष्पलता खरात,अरुण कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.