नवी दिल्ली : देशात टीनएज मुलांच्या लसीकरणाला उद्यापासून (३ जानेवारी) सुरुवात होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणीला प्रतिसाद मिळत आहे. आज एकूण नोंदणी ही ६ लाख ७९ हजार ०६४ वर पोहोचली आहे. कोविन अॅपवर ही नोंदणी करण्यात आली आहे. (Increasing response to teenagers vaccination total 679064 registrations)
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामध्ये नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं मोठी डोकेदुखी वाढवली आहे. या सुपरस्रेडर व्हेरियंटमुळं देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या लाटेमध्ये मुलांना धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, DCGIनं भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांवरील चाचण्यानंतर नुकतीच परवानगी दिली. त्यामुळं देशातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसचा मुहूर्त साधत देशात ३ जानेवारीपासून मुलांचं लसीकरण सुरु होत असल्याची घोषणा केली. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील कोमॉब्रिड नागरिकांसाठी बूस्टर डोसची घोषणा केली.
दरम्यान, १ जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काल नोंदणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे अडीच लाखांहून अधिक नोंदणी झाली होती. त्यानंतर आज एकूण नोंदणी ६ लाख ७९ हजार ०६४ वर पोहचली आहे. म्हणजेच आज दुसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे.
कोविन पोर्टलवर नोंदणी कशी करायची?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन App लसीकरणासाठी नोंदणी करणं प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. यामुळे तुम्हाला लसीकरण केंद्र, तारीख आणि वेळ हा स्लॉट बूक होतो.
CoWIN वेबसाईटला भेट दिल्यानंतर उजव्या कोपऱ्यात Register / Sign in yourself हा पर्यात उपलब्ध आहे. या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्ही जो मोबाईल नंबर देणार तो तुमच्या वापरातील असावा जेणेकरून त्यावर प्राप्त होणाऱ्या OTP नं तुम्ही पुढची प्रक्रिया सहज करु शकता.
Register for Vaccination ची विंडोवर तुम्हाला जी माहिती भरायची आहे त्यात फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी ही माहिती तुम्हाला भरायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर Register पर्यायावर क्लिक करायचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.