Indian Army Common Uniform : 1 ऑगस्टपासून भारतीय लष्करात नवा बदल करण्यात आला आहे. आता ब्रिगेडियर आणि त्यावरील दर्जाच्या अधिकार्यांचा गणवेश सारखाच राहील. आर्मी कमांडर कॉन्फरन्स मध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता गणवेशात अनेक बदल पाहायला मिळतील. भारतीय सैन्यात ब्रिगेडियर आणि त्याहून वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे कमांडिंग युनिट्स आणि बटालियन सांभाळण्याचा अनुभव असतो.
यातील बहुतांश अधिकारी हे मुख्यालयात तैनात असतात. नवीन नियमानुसार त्यांच्या गणवेशात काय बदल झाले आहेत आणि हा निर्णय का घेतला गेला हे जाणून घ्या.
1. ब्रिगेडियर आणि त्याहून वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी समान गणवेशाचा निर्णय एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्मी कमांडर्सच्या परिषदेत हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यात आली आहे.
2. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिधान केलेला गणवेश त्यांच्या शस्त्रांच्या आधारावर ठरवला जायचा. उदाहरणार्थ, गुरखा रायफल्सचे जनरल त्यांची ट्रेडमार्क कॅप घालायचे आणि एलिट आर्मर्ड रेजिमेंटसारखे तपकिरी बूट घालायचे.
3. नव्या बदलानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी फक्त काळे बूट घालतील. बेल्टच्या बकलवर भारतीय लष्कराच चिन्ह असेल आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी शोल्डर रँकचे बॅज सोनेरी रंगाचे असतील.
4. लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आता फ्लॅग रँकच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील बॅज, कॅप, कॉलरवर दिसणारे जॉर्जेट पॅच, बेल्ट आणि शूज सारखेच असतील.
5. आतापर्यंत, गढवाल रायफल्स, राजपुताना रायफल्स आणि गुरखा यांसारख्या रायफल रेजिमेंटचे अधिकारी काळ्या रँकचे बॅज घालत होते, परंतु आता सामान्य गणवेशावरून रेजिमेंट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची रँक ओळखता येणार नाही.
गणवेश बदलण्याचा निर्णय का घेतला गेला?
वरिष्ठ अधिकार्यांची ओळख समान असावी यासाठी ब्रिगेडियर आणि त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्यांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यात सामान्य गणवेशावर बोलत असताना, माजी नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा (सेवानिवृत्त) म्हणाले होते की, एकदा तुम्ही विशिष्ट पदावर पोहोचलात की तुमची रेजिमेंटशी संलग्नता कमी होऊ शकते.
वरिष्ठ अधिकारी एकाच गटाचे असतील तर ते त्यात फरक पडणार नाही. लष्करी अधिका-यांनी सांगितले की, एकसारखा गणवेश लष्कराच्या लोकाचाराचे प्रतिबिंबित करेल आणि वरिष्ठ अधिकार्यांसाठी समान ओळख सुनिश्चित करेल. त्याच वेळी, कर्नल आणि त्या खालील पदांसाठी गणवेशात कोणतही बदल करण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.