Independence Day: परदेशी भूमीवर पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकविला तो मादाम कामा यांनी

'क्रांती ची जननी' म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा भिकाजी कामांनी १९०७ मध्ये विदेशात जाऊन पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकविला.
madam Kama
madam Kamasakal
Updated on
Summary

क्रांतिकारक महिला म्हणजे भिकाजी कामा यांना 'क्रांतीची जननी' म्हणून संबोधले जाते अशा भिकाजी कामांनी १९०७ मध्ये विदेशात जाऊन पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकविला. भारताबाहेर राहून देखील सर्वांच्या मनात स्फुल्लिंग चेतविणाऱ्या भिकाजींची देशभक्ती व त्यांचे परदेशातील कार्य पाहून ब्रिटीश सरकारलाही धडकी भरायची. शेवटी ही धास्ती इतकी वाढली की ब्रिटीश सरकारने फ्रान्स सरकारकडे अशी मागणी केली की भिकाजीना फ्रान्समधून पाठवावे व ब्रिटीशांकडे सोपवावे. पण फ्रान्सने ब्रिटीशांची ही मागणी धुडकावून लाववी.

- शैलजा अजित निटवे

-- शैलजा अजित निटवे

यंदा भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ! जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन ! भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास म्हणजे एक धगधगते यज्ञकुंड ! या यज्ञकुंडात ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे पुण्य स्मरण करण्याचा दिवस म्हणजे स्वातंत्र्यदिन ! इ.स. १८५६ मध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि मंगल पांडे, झाशीची राणी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले. त्यानंतर हा वणवा पेटतच गेला. आणि १५० वर्षे हा लढा चालूच राहिला. अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले अन् आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या वातावरणात श्वास घेत आहोत.

madam Kama
Independence Day: 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'

एके काळी भारत म्हणजे अत्यंत सुखी-समाधानी व ऐश्वर्यसंपन्न असा देश होता. या सुजलाम् सुफलाम् ओळख 'सोन्याचा धूर निघणारी भूमी' म्हणून होती. यामुळेच देशाची या देशावर अनेकदा परकीय आक्रमणे झाली पण येथील स्वाभिमानी राजानी, जनतेनी ती परतवून लावली.

यंदा स्वातंत्र्याचा उत्सव भव्य प्रमाणात साजरा होत आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार ! "मी या लोकशाहीतील सार्वभौम देशाचा नागरिक आहे आणि माझ्या घरी मी तिरंगा फडकविणार" हा देशप्रेम अभिव्यक्तीचा आनंद आता घरोघरी मिळणार !

तिरंगा राष्ट्रध्वज ही आमची अस्मिता ! भारतीय संस्कृतीत ध्वजाचे महत्व पुरातन काळापासून आहे. ध्वज म्हणजे यशाचे प्रतीक ! भारताच्या तिरंगी ध्वजाचा इतिहास फार मोठा आहे. तिरंगा ध्वज आज जो आपण पाहतो त्यात वेळोवेळी सात वेळा परिवर्तन झाले. १८५७ पासून इंग्रजानी त्यांचा ध्वज आपल्या देशावर लागू केला पण आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्या पासून केशरी, पांढरा, हिरवा अशा तीन रंगांचा आयताकृती ध्वज असून त्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे

madam Kama
Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी इडल्या कशा तयार करायच्या?

भारताचा झेंडा हातामध्ये घेऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे व आपले सारे जीवन देशासाठी समर्पित करणारे अनेक वीर पुरुष आणि वीर महिला यांच्या कार्यकर्तृत्वाने इतिहासाची असंख्य पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत.

त्यातील एक क्रांतिकारक महिला म्हणजे भिकाजी कामा ! 'क्रांती ची जननी' म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा भिकाजी कामांनी १९०७ मध्ये विदेशात जाऊन पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकविला.

भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबई येथील एका समृद्ध पारसी कुटुंबात झाला. मॅडम कामांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मॅडम कामांनी इंग्रजीतून शिक्षण घेतले. इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. लहानपणापासूनच त्याना ब्रिटीश राजवटीविषयी संताप यायचा. त्यांच्याविरुद्ध आपण काय करू शकतो या विषयी त्या विचार करायच्या.

madam Kama
Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी ढोकळा कसा तयार करायचा?

मुलीची ही राष्ट्रभक्ती पाहून त्यांचे वडील सोहराबजी पटेल हे चिंतामग्न होत असत. लहानपणी त्या जेव्हा 'अलेक्झांडर नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टट्यूट' मध्ये शिकायच्या तेव्हाही आपल्या शिक्षकांना विरोध करायच्या कारण त्यांचे शिक्षक ब्रिटीश अधिकाऱ्यांचे कौतुक करायचे. भिकाजींच्या वडिलांची चिंता दिवसेंदिवस वाटू लागली. आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार ते करू लागले. वडिलांचा चिंतामग्न चेहरा पाहून भिकाजींच्या आई देखील दु:खी-कष्टी होऊ लागल्या.

आपल्या मुलीचे आपण लवकरात लवकर लग्न केले तर साज्या चिंता मिटतील असे आईला वाटले व आपले विचार त्यांनी आपल्या पतिदेवाना सांगितले. अखेर १८८५ मध्ये एका पारशी समाजसुधारकांच्या कुटूंबामध्ये रुस्तुमजी कामा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. रुस्तुमजी कामा हे उच्चशिक्षित तर होतेच पण सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने वकील होते. रुस्तुमजींच्यावर ब्रिटीश राजवट व त्यांचे विचार यांचा फार मोठा पगडा होता. त्यांना असे वाटायचे की भारताचा विकास तेंव्हाच होऊ शकेल जेव्हा सर्व भारतीय त्यांच्या विचारप्रणालीनुसार आचरण करतील. याउलट रुस्तुमजींच्या पत्नी भिकाजी या राष्ट्रीय विचारप्रणालीनुसार वर्तन करायच्या.

madam Kama
Independence Day : तुमच्या मित्रांना शेअर करा स्वतंत्र्यदिनाचे कोट्स

राष्ट्राच्या विचाराने त्या भारावलेल्या होत्या. त्याना विश्वास होता की ब्रिटीश भारताला फसवत आहेत. यास्तव कोणत्याही प्रकारे लढा द्यावा लागला तरी तो देऊन स्वातंत्र्य मिळवायचेच असा त्यांचा आग्रह होता. स्वातंत्र्य' या विषयावरून दोघांमधील e मतभेद इतके विकोपास गेले की पती-पत्नी म्हणून असणार दोघांमधील हे नाते संपुष्टात आले. इतकेच नाही तर परस्परांमधील मतभेद दिवसेंदिवस इतके वाढत गेले की जेव्हा भिकाजींचा मृत्यु झाला तेव्हा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासही. रुस्तुमजी गेले नाहीत.

भिकाजींचा जीवनपट म्हणजे देशभक्ती व कर्तव्यपूर्तिचा निखळ झरा ! 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' मानणाऱ्या भिकाजींच्या मनात भारतीयांच्या विषयी कळवळा होता.

सन १८९६ मध्ये मुंबईमध्ये सर्वत्र भयंकर अशा प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला. अनेक लोक संकटात सापडले. अशावेळी भिकाजी कामांनी परिचारिका बनून रोग्यांची सेवा शुश्रूषा केली दुर्दैव असे की रोग्यांची सेवा करता करता त्या स्वतःच प्लेगची शिकार बनल्या. अशावेळी स्वतःवर योग्य ते इलाज करून घेण्यासाठी त्या युरोपला गेल्या. १९०६ साली भिकाजी कामा लंडनला पोहोचल्या. तेथे गेल्यावर त्यांची क्रांतिकारी आंदोलकांची घुरा सांभाळणारे श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाल आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी भेट झाली.

madam Kama
Independence Day : तुमच्या मित्रांना शेअर करा स्वतंत्र्यदिनाचे कोट्स

लंडनमध्ये असतानाच भिकाजी भारताचे पितामह म्हणून ख्यातिप्राप्त असलेले 'दादाभाई नौरोजी' यांच्या संपर्कात आल्या. थोर समाजसेवक दादाभाई नौरोजी यांची ' सेक्रेटरी म्हणून ही त्यांनी काम पाहिले. ब्रिटीश संसदेची निवडणूक लढविणारे दादाभाई नौरोजी हे पहिले आशियाई गृहस्थ होते.

युरोपात असताना कामांनी युवकाना एकत्र करून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांना ब्रिटीश शासनाच्या जुलमी राजवटीची माहिती दिली. लंडनमध्ये असताना त्यांनी पुस्तक प्रकाशनाचे कामही सुरू केले. त्यांनी विशेषत: देशभक्तीपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. सावरकरांचे ' १८५७ चा स्वातंत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत असत.

खेळण्यांमध्ये रिव्हाल्व्हर लपवून ती खेळणी त्या क्रांतिकारकांपर्यंत पोचवत, १९०७ साली जर्मनीतल्या स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारोंच्यावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत ज्या ज्या देशातून लोक आले होते त्या त्या देशाचा झेंडा लावण्यात आला होता. परंतु भारताचा झेंडा म्हणून. ब्रिटीशांचा झेंडा लावण्यात आला होता. भिकाजी कामाना ब्रिटीशांचा झेंडा लावणे ही गोष्ट मान्य नव्हती म्हणून त्यांनी एक नवीन झेंडा बनविला होता व भारताचा झेंडा' म्हणून तो झेंडा त्यांनी परिषदेत लावला.

या परिषदेत जाताना त्या साडी परिधान करून गेल्या होत्या.. भारतीय संस्कृति व सभ्यता यांच्याविषयी त्यांच्या मनात आदरभाव होता.

madam Kama
Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी ढोकळा कसा तयार करायचा?

स्वातंत्र्यवीर सावरकर व श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकारकांच्या मदतीने भिकाजी कामा यांनी भारताचा नवीन झेंडा बनविला व जर्मनीमध्ये फडकविला. विदेशामध्ये भारताचा झेंडा फडकविणाऱ्या पहिल्या क्रांतिकारक महिला म्हणून त्या विख्यात आहेत. म्हणूनच त्यांना" भारतीय . क्रांतिची जननी' असे संबोधले जाते.

भिकाजी कामा यांनी फडकविलेला झेंडा हा आजच्या सारखा नव्हता जसा आज आपला राष्ट्रीय ध्वज आहे स्वातंत्र्य संग्रामाच्या दरम्यान बनविण्यात आलेल्या तमाम अनौपचारिक झेंड्यांपैकी तो एक झेंडा होता. त्या झेंड्यामध्ये तीन रंगाचे पट्टे होते.

हिरवा पिवळा व लाल अशा तीन रंगांच्या पट्ट्यांपैकी सर्वात वर असलेल्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यावर आठ कमळाची फुले होती. ज्यातून भारतातील आठ राज्यांचे प्रतिक दर्शविण्यात आले होते. मधोमध पिवळ्या रंगाचा पट्टा होता. ज्यावर 'वंदे मातरम्' असे देवनागरी लिपीमधील अक्षरांनी लिहिले होते. सर्वात खाली लाल रंगाची पट्टी होती. ज्यावर चंद्र, सूर्य दाखविण्यात आले होते. सूर्य व चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वासाचे प्रतिक होते. या झेंड्यातील लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. केशरी विजयाचे तर दिखा रंग धीटपणा व उत्साहाचे प्रतिक आहे. भिकाजी कामा यांनी फडकविलेला झेंडा आजही पुणे येथील केसरी -मराठाच्या वाचनालयात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे..

madam Kama
Independence day : स्वातंत्र्यलढ्यातील या घोषणा ठरल्या होत्या प्रेरणादायी

भिकाजी कामा सुमारे 33 वर्षे भारताबाहेर राहिल्या या दरम्यान त्यांनी युरोप खंडातील विविध देशांमध्ये जाऊन भारतीय जनतेवर ब्रिटीशांमार्फत होत असणारे अत्याचार व त्यांचा छळ या विषयी जन-जागरण केले. राष्ट्रभक्तीची भावना लोकांच्या मनात जागविली, देश-विदेशामध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय नागरिकांच्या त्यांनी गाठी-भेटी घेतल्या. कित्येक संमेलनामध्ये त्यांनी भाषणे दिली. भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व विशद करणारे क्रांतिकारी लेख लिहिले.

यूरोपातील दौऱ्याच्या दरम्यान भिकाजीनी पॅरिस इंडियन सोसायटी' ची स्थापना केली. याच दौऱ्याच्या दरम्यान वंदे मातरम्' नावाचे क्रांतिकारी विचारसरणी असलेले मासिक केले.

भारताबाहेर राहून देखील सर्वांच्या मनात स्फुल्लिंग चेतविणाऱ्या भिकाजींची देशभक्ती व त्यांचे परदेशातील कार्य पाहून ब्रिटीश सरकारलाही धडकी भरायची. शेवटी ही धास्ती इतकी वाढली की ब्रिटीश सरकारने फ्रान्स सरकारकडे अशी मागणी केली की भिकाजीना फ्रान्समधून पाठवावे व ब्रिटीशांकडे सोपवावे. पण फ्रान्सने ब्रिटीशांची ही मागणी धुडकावून लावली.

madam Kama
Republic Day : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक माहितीये?

त्या नंतर इंग्लंड व १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर फ्रान्स ही राष्ट्र एक झाली. मग मात्र भिकाजीना फ्रान्स देश सोडावा लागला. "यापुढे कोणतेही राष्ट्रीय कार्य करणार नाही " असे कबूल करून घेतल्यावरच त्याना भारतात येण्याची परवानगी ब्रिटीशानी दिली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोही नामांकित क्रांतिकारकांच्या यादीतील वीर स्वातंत्र्य सेनानी' म्हणून भिकाजींचा उल्लेख करावा लागेल. मातृभूमिला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपले सारे आयुष्य खर्ची घालणाऱ्या भिकाजींचे सारे जीवन म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक सोनरी पान ।

आपल्या जीवनाच्या संध्या समयी, वयाच्या ७४ व्या वर्षी त्या १९३५ साली भारतात परतल्या.. मुंबई येथील पारशी जनरल हॉस्पिटल' मध्ये १३ ऑगस्ट १९३६ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या अंत्य समयी देखील त्यांनी 'वंदे मातरम्' म्हणत शेवटचा श्वास घेतला. मात्र भारताचे स्वातंत्र्य पाहण्याचे भाग्य त्याना लाभले नाही भिकाजीनी नेहमीच अशी घोषणा दिली की " भारत आजाद होना चाहिए ; भारत एक गणतंत्र होना चाहिए, भारत में एकता होनी चाहिए।"।

सन १९६२ मध्ये भारताच्या पोस्ट व तारायंत्र विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भिकाजींच्या नावे एक पोस्टाचे तिकीट काढण्यात आले. आपल्या देशातील अनेक मार्ग आणि इमारतीना त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच तटरक्षक सेनेने देखील त्यांच्या जहाजाना भिकाजींचे नाव दिले आहे. १३ ऑगस्ट म्हणजे भिकाजींच्या पुण्यस्मरणाचा दिवस! भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महिला क्रांतिकारक' म्हणून त्या सदैव आपल्या स्मरणात राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.