देशातील सर्व सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 व्या स्वातंत्र्यानिमित्त लाल किल्ल्यावर झेंडा फडकावल्यानंतर देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. त्यावेळी मोदींनी देशातील महिला आणि मुलींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला अनेक मुलींनी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळावं यासाठी विनंती केली. आम्ही मिझोरममध्ये प्रयोग केला होता. पण आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. आता सरकारने ठरवलं आहे की देशातल्या सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडले जाईल. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील".
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. एक वेळ येते जेव्हा देश नव्या संकल्पासोबत पुढे जातो. आता ती वेळ आली आहे. आपल्याला असा भारत निर्माण करायचाय जेथे गाव आणि शहरातील सुविधेचा स्तर वेगळा असू नये. असा देश निर्माण करायचा आहे जेथे सर्व सुविधा असतील. देशात मेडिकल जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा गावापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आतापर्यंत ७५ हजारांपेक्षा अधिक हेल्थ सेंटर बनवण्यात आले आहेत.
भारतीय रेल्वे नव्या रुपात समोर येत आहे. गतीने आधुनिक रुप घेत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 आठवड्यात 75 वंदे भारत रेल्वे देशाच्या प्रत्येक भागाला जोडतील, असं मोदी म्हणाले आहेत. देशात हवाई सेवा वाढत आहेत. अनेत भागात विमानसेवा पोहोचत आहे. कनेक्टिविटी वाढत आहे, असंही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.