रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी तसेच नातू पृथ्वी अंबानी यांच्यासोबत देशाचा ७५ वा तंत्र्य दिन साजरा केला.
पुण्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवार वाडा येथे विंटेज आणि इम्पोर्टेड कारचे प्रदर्शन आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.द कार क्लब ऑफ पुणेकडून या सुपर कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी शनिवार वाड्यात तुफान गर्दी होत आहे. वीस प्रकारच्या विंटेज आणि इम्पोर्टेड कार या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात फरारी,रोल्स रॉयल्स, लेम्बोर्गिनी, Mustang, मर्सिडीज आदी विंटेज आणि इम्पोर्टेड गाड्यांचा समावेश असणार आहे.
शनिवार वाड्यापासून निघालेली रॅली कोरेगाव पार्क मधील Westin हॉटेल पर्यंत जाणार आहे. येत्या काळात याच गाड्यांमधून अनाथ आश्रमात असणाऱ्या मुलांना याच गाड्यांमधून सफर घडवणार असून जितक्या गाड्या आगामी काळात एकत्र येतील तेवढी झाड देखील लावण्याचा मानस द कार क्लब कडून करण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे सदस्य तन्मय इंगवले यांनी दिली.
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण करणार आहेत. पंतप्रधानांनी ट्वीट करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. देशभर सध्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने देश तिरंग्याच्या रंगात रंगून गेला आहे. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं.
देशवासियांना स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी जगभरात पसरलेल्या सर्व भारतप्रेमींना, भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो.
स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक महापुरुषाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. अमृत महोत्सवादरम्यान या सगळ्यांना नमन करता आलं. काल १४ ऑगस्टला भारताने फाळणीच्या दुःखद आठवणी जागवणारा, तिरंग्यासाठी बलिदान केलेल्यांचा सन्मान केला. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. देशासाठी प्राण देणारे, देशाच्या विकासासाठी कार्यरत असणारे, पोलीस, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी या सगळ्यांच्या योगदानाचंही आज स्मरण करुयात. अनेक प्रकारच्या संकटातही देशाला पुढे नेण्यासाठी ज्या नागरिकांनी प्रयत्न केले, त्यांचंही आज स्मरण करूया.
भारताची विविधता हीच भारताची खरी शक्ती आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. Mother of Democracy. ज्यांच्या अंगातच लोकशाही असते, ते जेव्हा संकल्प करतात, तेव्हा जगातली मोठमोठी साम्राज्यही हादरतात. ही लोकशाहीची जननी असलेल्या आपल्या भारताने हे सिद्ध केलं की आपल्याकडे अनमोल सामर्थ्य आहे. ७५ वर्षांच्या या यात्रेमध्ये अनेक संकटांनंतर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. २०१४ मध्ये मला देशवासियांनी दायित्व दिलं. स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करण्याची संधी मिळाली.
देशातली सामूहिक चेतना हीच देशाची शक्ती आहे. जेव्हा कोरोना काळात लोक टाळ्या-थाळ्या वाजवतात, दिवे लावतात, तेव्हा देशवासियांच्या चेतनेची सामर्थ्याची अनुभूती येते. या सामर्थ्याने देशाला नवी शक्ती दिली आहे. संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. जग अपेक्षेने भारताकडे बघतंय. जगाच्या विचारात झालेलं परिवर्तन हे ७५ वर्षांच्या यात्रेचं फळ आहे. आपण जो संकल्प घेऊन चाललोय, त्याकडे जग बघतंय.
विकसित भारत हा एकच संकल्प घेऊन आता भारत पुढे चालेल.
कोणाही भारतीयाच्या मनात गुलामीचा अंशही राहायला नको.
आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. चौथा संकल्प म्हणजे एकता आणि एकजूट.
१३० कोटी देशवासियांच्यात एकता असयला हवी.
पाचवा संकल्प म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. ज्यातून पंतप्रधान, मुख्यमंत्रीही सुटू शकत नाही.
स्वातंत्र्याचा व्यापक संकल्प आपण घेतला होता आणि पाहा तो पूर्णही झाला. असेच मोठी संकल्प करायला हवेत. माझ्या देशातल्या तरुणांनो, जेव्हा देश स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण करेल तेव्हा तुम्ही ५० -५५ वर्षांचे असाल, तुमच्या आयुष्यातला हा २०-२५ वर्षांचा काळ देशाचं रुप पालटेल. माझ्यासोबत तुम्ही विकसित देशाचा संकल्प घेऊन पुढे चला. आपण मानवकेंद्रीकरणाला विकसित करूया. भारत मोठे संकल्प करतो, तेव्हा तो ते करूनही दाखवतो. स्वच्छ भारत अभियान - आज देशवासियांना अस्वच्छता बघून चिड येते. आपण भारत स्वच्छ करुन दाखवला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण आपण करुन दाखवलं.
आम्हाला आमच्या सामर्थ्यांवर विश्वास आहे. पूर्ण ताकदीने देश पुढे जात आहे. स्त्रीचा अपमान करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून मुक्तीचा संकल्प करा, भारताचा जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याचा प्रयत्न करा. यंदा प्रथमच स्वदेशी तोफांनी सलामी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत हा सरकारी कार्यक्रम नसून सामाजिक कार्यक्रम आहे.आत्मनिर्भर हे जनआंदोलन आहे. जमिनीशी नाळ जुळेल तेव्हा आपण झेप घेऊ शकणार आहोत.
भ्रष्टाचाराने देश पोखरला जातोय. देशाच्या शुद्धीकरणासाठी परिवारवादाविरोधात लढा देणं गरजेचं आहे. या लढ्यात मला साथ द्या, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई इथं मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातल्या विकासकामांची माहिती दिली. तसंच कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नाही, असं म्हणत जनतेला काळजी घेण्याचं आणि कोरोनाची लस घेण्याचं आवाहनही केलं आहे.
ध्वजारोहणानंतर झालेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देश अमृत महोत्सवात न्हाऊन निघालाय. राज्यात आता नवं सरकार स्थापन झालंय. आम्ही पहिल्या दिवसापासून कामाला लागलोय. राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. तिथे पंचनामे झाले, यावेळी आम्ही दुप्पट मदत केलीय. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींना दिलासा मिळालाय. स्टार्टअपमुळे ग्रामीण शहरी भागांत सेवा दिली जातेय. पंतप्रधान आणि गृहमंत्री तसंच सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध होते. दोन वर्षांनंतर हा सोहळा होतोय. धोका कमी झालेला नाही, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे कोरोनाचा बुस्टर डोस सगळ्यांनी घ्या, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
पुण्यात सकाळी 9 वाजता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.