PM Modi Speech : 5 संदेश, 3 टीका अन् एक भविष्यवाणी; मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे भाषण

PM Modi Speech
PM Modi Speech esakal
Updated on

नवी दिल्लीः देशाच्या ७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासियांना कुटुंबिय म्हणत कौतुक केलं. भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी पुढच्या वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरुन भाषण देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधानांनी तब्बल दीड तास केलेल्या भाषणामध्ये २०१४च्या निवडणुका, महागाई, देशाचा विकास आणि आगामी निवडणुकांसंबंधी भाष्य केलं. मोदींनी आपल्या भाषणातून ५ संदेश दिले तर तीन टीकात्मक विधानं केली असून एक भविष्यवाणीदेखी केली.

महिला नेतृत्व आणि मणिपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करुन केली. त्यानंतर त्यांनी लगेचच मणिपूरच्या मुद्द्याला हात घातला. महिलांवर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मणिपूरमध्ये आता शांतता प्रस्थापित होत असल्याचं सांगून मागच्या पाच वर्षांमध्ये महिलांच्या नेतृत्वात विकास झाल्याचं नमूद केलं. शिवाय दोन कोटी महिलांना उद्योगात सक्षम करण्याचा स्वप्न बोलून दाखवलं.

दहशतवादावर हल्ला

पंतप्रधानांनी मागे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख विरोधकांवर आसूड ओढला. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारला दहशतवादाने हादरे दिले असं म्हणत त्यांनी भारतीयांना माझं कुटुंब आहे, असं म्हटलं. पूर्वी बॉम्बच्या भीतीने याला स्पर्श करु नका, त्याला स्पर्श करु नका असे संदेश दिले जात होते. आता ते दिवस संपल्याचं मोदींनी सांगितलं.

भ्रष्टाचाराला आळा...

पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख संदेश म्हणजे पारदर्शक व्यवस्था. भ्रष्टाचार आणि पूर्वीच्या घोटाळ्यांच्या बातम्यांचा त्यांनी दाखला दिला. ते म्हणाले, की, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहणे हीच माझी आयुष्याची बांधिलकी आहे. याला तीन "दुष्कृत्यांपैकी एक" म्हणत त्यांनी भारताचा विकास करण्यासाठी प्रामाणिकता, पारदर्शकता निष्पक्षता यांना प्रोत्साहन देणे ही भारताची सामूहिक जबाबदारी आहे, असं म्हटलं. मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात आपल्या सरकारने उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकला.

घराणेशाहीवर हल्ला

पंतप्रधानांनीही घराणेशाही आणि घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. भारताला घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त होण्याचे आवाहन करताना, त्यांनी काही राजकीय पक्षांवर निशाणा साधला. घराणेशाहीमुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचं मोदींनी नमूद केलं.

कडक शब्दांमध्ये तिसरी टीका

पंतप्रधानांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, 'तिसरी वाईट म्हणजे तुष्टीकरण. ज्याने राष्ट्रीय चारित्र्याला कलंक लावला... माझा ठाम विश्वास आहे की 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा देश विकसित भारत असेल. पण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन वाईट गोष्टींशी लढणे ही काळाची गरज आहे. शिवाय पुढच्या वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावर येऊन भाषण करेल, अशी भविष्यवाणी शेवटी मोदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.