Independence Day 2023 : अखंड भारताच्या निर्मितीतील 'महानायका'ची अनटोल्ड स्टोरी

Independence Day 2023 : अखंड भारताचा पाया रचण्यामध्ये ज्या व्यक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्यांच्या जीवनाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
VP Menon Unsung Hero of India’s Unification
VP Menon Unsung Hero of India’s UnificationSakal
Updated on

वर्ष 1947मध्ये जेव्हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यलढा शेवटच्या टप्प्यावर होता, त्या वेळी भारत सरकार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकच ध्येय होते ते म्हणजे अखंड राष्ट्राचे निर्माण करणे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जून 1947 मध्ये राज्य विभागाची स्थापना करण्यात आली आणि त्याचे नेतृत्व दोन महत्त्वाच्या व्यक्तींकडे सोपवण्यात आले.

या महत्त्वाच्या कार्यातील पहिले नाव म्हणजे आपल्या देशाचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आणि दुसरे म्हणजे पटेल यांचे निकटवर्तीय - व्ही.पी. मेनन - ज्यांचे नाव आजच्या राजकीय इतिहासात हरवलेले दिसते!

VP Menon Unsung Hero of India’s Unification
Independence Day 2023 Stories Of Martyrs : राम प्रसाद बिस्मिल यांची सच्ची साथीदार सुशीला दीदी! स्वातंत्र्यलढ्यात दिले अनोखे योगदान

तसे पाहायला गेले तर पटेल यांनीच तत्कालीन भारतीय राजांना त्यांची संस्थाने एका राष्ट्रात विलीन करण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून देण्याच्या योजनेवर काम केले असले, तरी ज्या व्यक्तीने ही योजना अंमलात आणण्याचे कार्य केले ते म्हणजे व्ही.पी मेनन. 

VP Menon Unsung Hero of India’s Unification
Independence Day 2023 : छोले भटुरेचा हा ऐतिहासिक प्रवास तुम्हाला माहितीये का?

एका दरबारातून दुस-या दरबारात फिरणे, राजांसमोर प्रस्ताव मांडणे, करारनामे तयार करणे ही सर्व कार्य मेनन यांनी केली. ही कार्य खूपच अवघड होती, पण आपल्या कौशल्याने संस्थानांचा ताबा घेण्यात त्यांना यश मिळाले.  

एकदा एका राजाने रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखली होती आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मेनन यांच्या धाडसी कार्याची आणि त्यांच्या अनुभवाची झलक त्यांनी लिहिलेल्या ‘द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ द इंडियन स्टेट्स’ या पुस्तकात आढळते.

VP Menon Unsung Hero of India’s Unification
Independence Day 2023: कापडाच्या चिंध्यांपासून बनवतात कागद! गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी दिली होती 'इको फ्रेंडली' आयडिया

व्ही.पी. मेनन यांचे सुरुवातीचे जीवन

व्ही.पी. मेनन यांचा जन्म 30 सप्टेंबर 1893 रोजी केरळमधील ओट्टापलममधील पनामन्ना या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते आणि मेनन हे बारा भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. एवढं मोठं कुटुंब चालवणं सोपं नव्हतं आणि कुटुंबीयांसमोर नेहमीच आर्थिक संकट उभे ठाकलेले असायचे. 

मेनन वयाने लहान होते जेव्हा त्यांनी एकदा त्यांच्या वडिलांना आर्थिक संपत्तीच्या अभावामुळे आपल्या मुलांना चांगले जीवन देऊ न शकल्याची खंत बोलून दाखवल्याचे ऐकले होते. वडिलांनी केलेल्या संघर्षाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. 

इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण थांबवले आणि नोकरी करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या खांद्यावरील जबाबदारीचे ओझे कमी व्हावे म्हणून त्यांनी लहान वयातच नोकरीच्या शोधात घर सोडले.

शिमल्यामध्ये होते बरीच वर्षे वास्तव्यास 

मजुरापासून ते कोळसा खाणीत काम करण्यापर्यंत आणि हमालीपासून ते कॉटन ब्रोकरपर्यंत सर्व प्रकारची छोटी-मोठी कामे त्यांनी केली आहेत. मेनन हे फार हुशार होते आणि यानंतर लवकरच त्यांनी बंगळुरूमधील एका कंपनीत क्लर्क टायपिस्ट म्हणून नोकरी मिळवली. 

इंग्रजी भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व तर होतेच, शिवाय प्रत्येक परिस्थिती समजून घेण्याची आणि त्यास सामोरे जाण्याची क्षमताही त्यांच्याकडे होती. काही काळानंतर सरकारी नोकरीच्या शोधात ते शिमला येथे पोहोचले.

1929 मध्ये येथे आल्यानंतर त्यांना गृह कार्यालयामध्ये  क्लर्क-टायपिस्टची नोकरी मिळाली. त्यांचं टायपिंग स्पीड चांगला होता, त्याचप्रमाणे त्यांच्या टायपिंगमध्ये कोणत्याही चुका होत नसे. याच कौशल्यामुळे त्यांनी लवकरच ब्रिटीश अधिकाऱ्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले.

सेनसिटिव्ह रिफॉर्म डिपार्टमेंटमध्ये बदली झाल्यानंतर मेनन हे भारताचे सर्वाधिक काळ सेवा करणारे व्हाईसरॉय ठरेल, लॉर्ड लिनलिथगो यांचे ते विश्वासू बनले. मेनन यांच्याकडे बरीच महत्त्वाची माहिती असायची आणि त्याच वेळी अनेक निर्णयांवर त्यांचा सल्लाही घेतला जायचा.

मेनन हे लिनलिथगो यांच्यासोबत त्यांच्या अनेक अधिकृत दौर्‍यावर इंग्लंडला जात असत आणि अशा प्रकारे तेथे राऊंडटेबल कॉन्फरंसमध्ये सहभागी होणारे ते एकमेव भारतीय अधिकारी होते.  1946 मध्ये मेनन यांना भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांचे Political Reforms Commissioner म्हणून नियुक्त करण्यात आले. 

त्यावेळी स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यात पोहोचला होता आणि  इंग्रजांनी भारत देशाला स्वतंत्र करण्याचे मान्य केले होते. इंग्रजांनी भारत सरकारच्या हाती सत्ता सोपवण्याची रणनीती बनवण्याची जबाबदारी मेनन यांच्यावर सोपवली होती.

मेनन यांची योजना आणि भारतीय राज्यांचे एकत्रीकरण

1947मध्ये मेनन काही काळासाठी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रालयाचे सचिव झाले होते. त्यांच्या राजकीय प्रतिभा आणि कार्यक्षमतेमुळे ते लवकरच पटेल यांचे जवळचे सहकारीही बनले. मेनन यांनी 500 हून अधिक संस्थानांना अखंड भारतामध्ये सामील करण्यासाठी पटेल यांच्यासोबत जवळून काम केले.

या कामातील गुंतागुंतीचे वर्णन करताना त्यांची जोधपूरच्या महाराजांशी झालेल्या भेटीचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. मेनन लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासोबत जोधपूरला गेले, जेथे त्यांच्यावर प्रजासत्ताक कराराच्या कागदांवर महाराजांची स्वाक्षरी मिळवण्याचे काम सोपवण्यात आले. 

महाराज आणि मेनन यांना एकटे सोडून लॉर्ड माउंटबॅटन बाहेर पडले. त्याच क्षणी महाराजांनी सही करण्यासाठी फाउंटन पेन काढले. ते पेन पाहून मेनन आश्चर्यचकित झाले कारण ते फक्त पेन नव्हते.

इतिहासकार कॉलिन्स आणि लॅपियर यांनी लिहिले आहे की,  “स्वाक्षरी केल्यानंतर त्यांनी पेन उघडले आणि त्यातून एक पिस्तुल काढले व मेनन यांच्या डोक्यासमोर पिस्तुल धरले. यानंतर मेनन कडक आवाजात म्हणाले की, मी तुम्हाला घाबरत नाही. हा आवाज ऐकून माउंटबॅटन परत आले आणि त्यांनी पिस्तुल ताब्यात घेतले”.

मेनन यांची ही रणनीती आणि मुत्सद्देगिरी होती की ज्यामुळे अतिशय जिद्दी राजेमंडळीही आपल्या संस्थानांचे भारत राष्ट्रात विलीनीकरण करण्यास तयार झाले. शिवाय, पाकिस्तानसोबतच्या काश्मीरच्या मुद्यावर आणि जुनागड- हैदराबादमध्ये मेनन यांनीच नेहरू- पटेल यांना लष्करी कारवाईचा सल्ला दिला होता.

त्यांची न ऐकलेली कथा  

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 1950 मध्ये निधन झाले आणि यानंतर मेनन यांची प्रसिद्धीही कमी झाली. स्वतंत्र भारतात त्यांचे कार्य तत्कालीन ओडिशा राज्याचे कार्यकारी राज्यपाल म्हणूनच मर्यादित होते. 1966 मध्ये स्वतंत्र अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते असलेल्या स्वतंत्र पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक बनले.

महाराणी गायत्री देवी आणि राजमाता सिंधिया यांसारख्या अनेक दिग्गजांनी या पक्षाचे सदस्यत्व घेतले होते. दरम्यान वाढत्या वयाबरोबर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यास मेननही अपवाद नाहीत. मेनन यांच्या पणती नारायणी बसू यांनी लेखात लिहिले की, मेनन आपल्या आयुष्याचा शेवटच्या क्षणी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीप्रमाणेच प्रसिद्धीपासून दूर होते. 31 डिसेंबर 1966 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी बंगळुरू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बसु यांनी असेही लिहिले आहे की,  “आतापर्यंत तो माणूस (मेनन) एक रहस्यच बनून राहिला आहे. विकिपीडिया पेजवरही त्यांचे वर्णन अस्पष्ट असेच आहे. आज गुजरातच्या जमिनीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अभिमानाने उभा आहे, पण व्ही.पी. मेनन यांच्या योगदानाची आठवण केल्याशिवाय भारताच्या एकात्मतेची कहाणी पूर्ण होऊ शकत नाही".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.