Independence Day 2023 : 'अशा' झाल्या होत्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख चळवळी...

शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी म्हणजे १८८८ मध्ये ते लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले.
Independence Day 2023
Independence Day 2023Sakal
Updated on

Independence Day 2023 - १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले,

पण ते खूप कमी काळ जगले. गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास, अशी त्यांची नावे होत.

शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी म्हणजे १८८८ मध्ये ते लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. येथे त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. बॅरिस्टर झाल्यानंतर १८९१ मध्ये ते भारतात परत आले आणि त्यांनी वकिली सुरू केली. १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी ते गेले आणि तेथे सुमारे २१ वर्षे राहिले.

दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात महात्मा गांधी यांचा राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित झाले. दक्षिण आफ्रिकेत गांधींना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक त्यांनी अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट असतानासुद्धा त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.

Independence Day 2023
Independence Day Red Fort : लाल किल्ला कधी बांधण्यात आला ? काय आहे त्याचा इतिहास ?

गांधीजींनी नकार देताच त्यांना अपमान करून गाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीजींनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. त्यानंतर भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी आवाज उठवण्यास सुरवात केली. तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता.

या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी १८९४ मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षाखाली आणले.

१९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले. तोपर्यंत एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी नेता, अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती झाली होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. मात्र भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना खऱ्या अर्थाने गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला.

गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. त्यांनी १९२० मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. गांधीजींना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले.

Independence Day 2023
Independence Day 2023: स्वातंत्र्यदिन खास बनवायचा आहे ना? मग या टिप्स वापरून मेकअप करून पाहाच!

गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांचा शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापर केला. मात्र पंजाबमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते.

१९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी विशेषतः ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. गांधीजींच्या असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पण चौरीचौरा येथील हिंसेमुळे असहकार चळवळ जोमात असतानाच थांबविण्यात आली. त्यानंतर १० मार्च १९२२ मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली.

Independence Day 2023
Mumbai Crime : भांडण सोडवायला गेलेल्या तरूणाचा कानाचा लचका तोडला; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

गांधीजींनी १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा ६ एप्रिलला ४०० किमीचा प्रवास करून दांडीला पोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडो असे ठणकावून सांगितले. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली.

यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे अंतिम फलीत म्हणजे १९४७ मध्ये ब्रिटिशानी फाळणी केली आणि गांधींनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले. अशा प्रकारे १५ ऑगस्ट १९ ४७ रोजी भारत स्वातंत्र झाला. मात्र, जास्त दिवस स्वतंत्र भारत पाहण्याचे भाग्य महात्मा गांधी यांनी लाभले नाही.

कारण ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत एका आंतरधर्मीय प्रार्थना सभेत छातीत तीन गोळ्या झाडून नथुराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींची हत्या केली. ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. त्यानंतर जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला.

स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे, असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि खेड्याच्या स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

Independence Day 2023
Indira Gandhi: इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे केले दोन तुकडे, बांगलादेश स्वातंत्र्य होण्यात भारताचा मोठा हात

अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. तसेच त्यांना प्रेमाने बापूही म्हटले जाते.

(संदर्भ - माहिती जालावरून)

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील झालेल्या काही प्रमुख चळवळी

चंपारण सत्याग्रह (१९१७)

खेडा सत्याग्रह (१९१८)

खिलाफत चळवळ (१९१९)

रौलेट कायदा (१९१९)

दांडी यात्रा (१९३०)

गांधी आर्विन करार (१९३१)

असहकार चळवळ

भारत छोडो आंदोलन ( १९४२ )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()